Join us

Exclusive : घटस्फोटानंतर ‘या’ सेलेब्सला पोटगीपोटी द्यावे लागले कोट्यावधी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2017 2:41 PM

तब्बल १८ वर्ष सुखाने संसार केल्यानंतर घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा निवडणाºया अभिनेता अरबाज खान अन् त्याची एकेकाळची पत्नी मलाइका ...

तब्बल १८ वर्ष सुखाने संसार केल्यानंतर घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा निवडणाºया अभिनेता अरबाज खान अन् त्याची एकेकाळची पत्नी मलाइका अरोरा यांचा संसारिक प्रवास अजून संपला असे म्हणता येणार नाही. कारण घटस्फोटानंतरच्या वाटाघाटी शिल्लक असून, किती कोटींमध्ये हे जोडपे सेटलमेंट करणार यावरून आता आखाडा रंगणार आहे. सूत्रानुसार मलाइकाने अरबाजकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली असून, ती १० कोटींपेक्षा एक रुपयाही कमी घेणार नसल्याचे समजते. वास्तविक न्यायालयाच्या निर्णयानुसार हे जोडपे जरी विभक्त झाल्याचे दाखवित असले तरी, त्यांच्यातील कौटुंबीक संबंध हे कायम असतात. हृतिक रोशन आणि सुजान खान हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. अशात हा घटस्फोट की निव्वळ अर्थकारणासाठी केलेली तडजोड असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...हृतिक रोशनला द्यावी लागली ३८० कोटींची पोटगी१३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि सुजैन खान हे विभक्त झाले. २००० सालात लव्ह मॅरेज केलेल्या या जोडप्यांचे विभक्त होणे खरं तर धक्कादायक होते. त्याचबरोबर घटस्फोटानंतर झालेल्या वाटाघाटीच्या मुद्द्यांवरून निर्माण झालेला पेचही अनेकांना गुंगारा आणणारा होता. कारण या दोघांचा घटस्फोट बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा घटस्फोट ठरला आहे. सुजैनने पोटगीपोटी हृतिककडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र ३८० कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली होती. आता हे दोघेही पती-पत्नीप्रमाणेच वावरत असल्याचे बºयाचदा बघावयास मिळाले आहे. प्रभूदेवाला द्यावी लागली २५ कोटींची प्रॉपर्टीडासिंग सुपरस्टार प्रभूदेवा आणि त्याची पत्नी रामलाथ यांच्यातील घटस्फोटही चांगलाच महागडा ठरला. कारण प्रभूदेवाने रामलाथला पोटगीपोटी दहा लाख रुपये तर दिलेच, शिवाय २५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आणि दोन महागड्या कारही त्याला द्याव्या लागल्या. त्यावेळी प्रभूदेवा अन् रामलाथमधील घटस्फोट खूपच चर्चेचा विषय ठरला होता. संजूबाबाला द्यावी लागली महागडी कारअभिनेता संजय दत्त हा सध्या मान्यता हिचा पती असून, मान्यता त्याची तिसरी पत्नी आहे. जेव्हा संजय दत्तने त्याची दुसरी पत्नी मॉडेल रेहा पिल्लई हिला घटस्फोट दिला होता, तेव्हा त्याला पोटगीपोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागले होते. त्यावेळी संजूबाबाने रेहाला ८ कोटी रुपये अन् एक महागडी कार दिली होती. करिष्माने मागितले सात कोटीअभिनेत्री करिष्मा कपूर हिने संजय कपूर याच्याबरोबर घटस्फोट घेतला असून, दोघांनीही आपापल्या वाटा निवडल्या आहेत. संजयने तर पुन्हा एकदा लग्न केले असून, करिष्मादेखील लग्नाच्या तयारीत आहे. दरम्यान, करिष्माने संजय दत्तकडे सात कोटी रुपयांची मागणी केली असून, त्यावर निर्णय येणे आहे. सैफने दिला निम्मा हिस्साअभिनेता सैफ अली खान करिना कपूर हिच्याबरोबर सुखाने संसार करीत आहे. दोघांच्या संसारात गेल्या काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्याचे आगमन झाल्याने सध्या हे दोघे खूश आहेत. वास्तविक करिना सैफची दुसरी पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंग असून, तिला सैफचे दोन मुले आहेत. जेव्हा या दोघांमध्ये घटस्फोट झाला होता, तेव्हा सैफला त्याच्या प्रॉपर्टीमधील निम्मा हिस्सा अमृताच्या नावे करावा लागला होता. मिस्टर परफेक्टनिस्टलाही द्यावी लागली पोटगीअभिनेता आमिर खान आणि रिना दत्ता यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या मर्जीविरोधात लग्न केले होते. काही काळानंतर दोघांमध्ये तिढा निर्माण होऊ लागला, त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आमिरने रिनाला पोटगीपोटी प्रचंड रक्कम दिली होती. मात्र दोघांनी त्याविषयी कधीच उलगडा केला नाही.