बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे दोघे नेहमी सोशल मीडियावर एकत्र फोटो व मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. रितेश बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतो आहे. मात्र लग्नानंतर जेनेलिया सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्याचं पहायला मिळतं आहे. मात्र नुकतेच लोकमतशी बोलताना रितेश देशमुखने जेनेलियाच्या कमबॅकबद्दल सांगितलं.
लग्नानंतर जेनेलिया सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीला वेळ देताना दिसते आहे. मात्र आजही तिचा चाहता वर्ग तिच्या कमबॅकची वाट पाहत आहे. जेनेलिया सिनेइंडस्ट्रीत अॅक्टिव्ह नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय असते. तिथे ती तिचे ग्लॅमरस फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे ती कधी अभिनयात कमबॅक करणार याची प्रतीक्षा तिचे चाहते करत आहेत.
रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो लवकरच बागी ३ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर व अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आता जेनेलिया कमबॅक कधी करते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.