Join us

Exclusive : बॉलिवूडमधील 'या' अविवाहित स्टार्सच्या चर्चेला उधाण !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:35 PM

-रवींद्र मोरे विराट कोहलीने सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माशी गेल्या वर्षी लग्न करुन बहुतांश तरुणींचे मन तोडले. भारताच्या मोस्ट एलिजिबल ...

-रवींद्र मोरे विराट कोहलीने सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माशी गेल्या वर्षी लग्न करुन बहुतांश तरुणींचे मन तोडले. भारताच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्सच्या यादीतून विराटचे नाव तर कमी झाले, मात्र आतादेखील काही सेलिब्रिटी आहेत जे बॅचलर्स आहेत. विशेष म्हणजे या अविवाहित सेलेब्सची बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाणही आहे. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत... * प्रभासबाहुबली स्टार प्रभास या यादीत टॉपवर आहे. बाहुबलीच्या दोन्ही फ्रॅन्चाइजीमध्ये अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटियासोबत रोमान्स करणाऱ्या प्रभासची फॅन लिस्ट खूपच मोठी आहे. दर आठवड्याला किंवा दर महिन्याला त्याच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल होत असतात, मात्र सध्या प्रभास लग्नाच्या मूड मध्ये नाही. असे समजले होते की, बाहुबली नंतर सहा हजारापेक्षा जास्त लग्नाचे प्रस्ताव आले होते. क्यूट लुक्स आणि फिट बॉडीचा प्रभास आतापर्यंत बेस्ट बॅचलर आहे.  * सलमान खानसुपरस्टार सलमान खानचे वय जेवढे वाढत आहे, तेवढीच त्याची फॅन फॉलोइंगदेखील वाढतच आहे. ५२ वर्षीय सलमानच्या लग्नाची चिंता सर्वांनाच आहे. विशेष म्हणजे याबाबत प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रश्न विचारला जातो. अगोदर क्यूट, मात्र आता माचो मॅन म्हणून ओळखल्या जाणाºया सलमानसाठीही मुलींची लाइन लागली आहे. सोशल मीडियावर त्याची टाइम लाइन नेहमी मुलींच्या मॅसेजने भरलेली असते, आणि देशातच नव्हे तर विदेशातही सलमानच्या फॅन भरपूर आहेत.  * रणबीर कपूर चॉकलेटी बॉय ते माचो मॅनची इमेज बनविणाचा प्रयत्न करणारा रणबीर कपूर जेव्हा पासून इंडस्ट्रीमध्ये आला, तेव्हा पासून त्याच्यासाठी मुलींची लाइन लागली आहे. दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ सारख्या सुंदर अभिनेत्र्यांना डेड करणारा रणबीर अजून सिंगल आहे आणि त्याचकारणाने मोठ्या संख्येने मुली त्यांच्या फॅन आहेत. तो ३५ वर्षाचा झाला असून त्याची आई नीतू कपूर त्याच्या लग्नासाठी मुली पाहत आहे.  * रणवीर सिंह३२ वर्षीय रणवीर सिंह टॉप अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, मात्र याने त्याच्या फॅन फॉलोइंगवर कोणताच परिणाम झाला नाही. मस्तीखोर, चार्मिंग, मल्टी टॅलेंटेड, फनी, लविंग रणवीर सिंहच्या मुली डाय हार्ड फॅन आहेत. मुलींच्या मते, त्याच्यात एक वेगळीच झलक आहे.  * वरुण धवनइंडस्ट्रीमध्ये नवा आणि सर्वात लहान वरुण धवनने दिग्गज स्टासला टक्कर दिली आहे. फक्त ३० वर्षाचा हा बॅचलर बाकी सर्व मोस्ट एलिजिबल बॅचलरच्या यादीत समावेश झाला आहे. अगदी लहानशा करिअरमध्ये कित्येक जोनरचे चित्रपट करणारा वरुण धवन त्याच्या लेटेस्ट ‘जुडवा-2’ नंतर तर मुलींना अजून जास्त आवडू लागला. डान्स, रोमान्स, कॉमेडी मध्ये परफेक्ट वरुण एक पॉवरपॅक आहे.