Join us

प्रतिक्षा संपली, या तारखेला प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा सुर्यवंशी, त्यातही आहे मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 8:19 PM

हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशीच निर्मात्यांची ईच्छा होती. त्यासाठी बराच वेळ निर्मांत्यांनी वाट पाहिली आहे.

गेल्याच वर्षी मार्च महिन्यात रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची भूमिका असलेला सूर्यवंशी हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कोरोनामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट २ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं  जाहीर करण्यात आले आहे. 

हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशीच निर्मात्यांची ईच्छा होती. त्यासाठी बराच वेळ निर्मांत्यांनी वाट पाहिली आहे. त्यामुळे निर्मात्यांची ईच्छा आहे की हा सिनेमा फिल्म सिंगल स्क्रीन आणि नॉन-नेशनल मल्टीप्लेक्स मध्ये रिलीज करण्यात यावा. याचा फटका मोठ्या थिएटरांना बसणार आहे. पीवीआर, आईनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवाल सारख्या मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा प्रदर्शित होणार नसल्यामुळे केवळ छोट्याच सिनेमाघरांमध्ये सिनेमा रसिकांना पाहाता येणार आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक निर्मांत्यांना सिनेमा प्रदर्शित करण्यासाी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधारा घ्यावा लागला होता. मात्र सुर्यंवशी सिनेमाबाब असे झाले नाही. त्यामुळे रसिकांना हा सिनेमा पाहायचा असेल तर थिएटकरडे वळावे लागेल. त्यामुळे सिनेमाला लॉकडाऊनंतर किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अबब! अक्षय कुमारने मानधनात केली इतक्या कोटींची वाढ, आकडा वाचून येईल भोवळ

अक्षय कुमारने आता पुन्हा एकदा आपल्या मानधनात वाढ केली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आपल्या चित्रपटासाठी १२० कोटी रुपये मानधन घेत होता. मात्र आता त्याने त्याच्या मानधनात वाढ करत १३५ कोटी रुपये केले आहेत. चित्रपटाशी निगडीत दिग्दर्शकांचे म्हणणे आहे की, अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. लोक त्याच्या चित्रपटातील मेसेज आणि त्याच्या अभिनयाबाबत खूप उत्सुक असतात. ज्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतो. त्यामुळे अक्षयची टीमलादेखील वाटते की इतके मानधन घेण्याचा त्याचा हक्क आहे.

टॅग्स :अक्षय कुमारसूर्यवंशी