Join us

फेसबुकवर उत्तर देणे पडले महाग! माथेफिरू चाहत्याने आणले सोनी सिंहच्या नाकीनऊ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 4:40 AM

चाहत्यांना सांभाळणेही सोपे नाही, याचा प्रत्यय सध्या लोकप्रीय टीव्ही अभिनेत्री सोनी सिंह हिला येतोय. होय, एका चाहत्याने तिची झोप ...

चाहत्यांना सांभाळणेही सोपे नाही, याचा प्रत्यय सध्या लोकप्रीय टीव्ही अभिनेत्री सोनी सिंह हिला येतोय. होय, एका चाहत्याने तिची झोप उडवलीय. सोशल मीडियावर या चाहत्यासोबत सोनीने चार-दोन गप्पा मारल्या आणि हा चाहता जणू सोनीच्या गळ्यातचं पडला. सोनीसोबत या चाहत्याने असे काही केले की, ती प्रचंड अस्वस्थ झाली. आता हे प्रकरण नेमके आहे काय, ते जाणून घेऊ यात. तर त्याचे झाले असे की, एका चाहत्याने फेसबुकच्या माध्यमातून सोनीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. चाहता समजून सोनीनेही त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले होते. पण हेच उत्तर देणे सोनीला महागात पडले.सोनी सिंहने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर मार्टिन नावाच्या या मुलाने तिला मॅसेज केला होता. मार्टिन हा आपला कुणी चाहता असावा, इतक्या सहज भावनेने सोनी त्याच्याशी बोलली होती. सोनीने याबद्दल  सांगितले की, तू कशी आहेस, असा मॅसेज त्याने मला केला होता. मी ठीक, असे उत्तर दिले होते. पण यानंतर मी तुला किस करू इच्छितो, असा दुसराच मॅसेज त्याने टाकला. तो पाहून मला धक्काच बसला. मी लगेच त्या मार्टिन नावाच्या व्यक्तिला फेसबुकवर ब्लॉक केले. पण यानंतर त्याने माझ्या अन्य सोशल साईट्सवरून मला मॅसेज करणे सुरू केले. मी इन्स्टाग्रामवरही त्याला ब्लॉक केले. मी लोकांचा रंग पाहून त्यांच्यासोबत भेदभाव करते, असे तो मला वारंवार म्हणत होता. तो असा कुठल्या संदर्भाने म्हणत होता, हे मला अजिबात ठाऊक नाही. यापुढे त्याने आपले हे वागणे थांबवले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायचं उरणार नाही.सोनी सिंहने अनेक लोकप्रीय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘नामकरण’ आणि ‘बेटियां’ या सारख्या मालिकांमध्ये ती दिसलीय. ‘बिग बॉस’च्या आठव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली.