Join us

विस्तारा एअरलाईन्सचा रिपोर्ट; ‘जायरा वसीमसोबत छेडछाड झाल्याचे आमच्या क्रूने बघितले नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 1:56 PM

‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीम हिच्याशी फ्लाइटमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणी विस्तारा एअरलाईन्सने डायरेक्टर जनरल सिव्हिल एविएशन (डीजीसीए) आणि सिव्हिल ...

‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीम हिच्याशी फ्लाइटमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणी विस्तारा एअरलाईन्सने डायरेक्टर जनरल सिव्हिल एविएशन (डीजीसीए) आणि सिव्हिल एविएशन मिनिस्ट्रीला रिपोर्ट दिला आहे. विस्ताराने रिपोर्टमध्ये म्हटले की, आम्हाला छेडछाडसारखे (विनयभंग) काहीही दिसले नाही. डीजीसीएला दिलेल्या रिपोर्टनुसार, संशयित आरोपी व्यावसायिक विकास सचदेवाने कॅबिन क्रूला चादर मागताना डिस्टर्ब न करण्यास सांगितले होते. त्याने फ्लाइटमध्ये जेवणदेखील केले नाही. संपूर्ण प्रवासादरम्यान चादर अंगावर घेऊन झोपलेला होता. लॅण्डिंगदरम्यान जायरा संशयित आरोपी विकासवर ओरडताना दिसली. कॅबिन क्रूने जायरासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही न बोलता ती तेथून निघून गेली. त्यानंतर क्रूला जायराच्या आईने संपूर्ण घटनेविषयी सांगितले. दरम्यान, विस्तारा एअरलाईन्सने डीजीसीएला पाठविलेल्या रिपोर्टनंतर जायराने केलेल्या आरोपांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिला पत्रकार आणि न्यूज अ‍ॅँकर जागृती शुक्लाने ट्विट करीत लिहिले की, ‘जायराचा ड्रामा आता उघड झाला आहे. विस्ताराने सांगितले की, त्यांच्या क्रूने संशयित आरोपीकडून कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन बघितले नाही. जायरा आणि तिची आई अशाप्रकारची तक्रार करण्यास तयार नव्हती. मात्र लॅण्डिंगनंतर जायरा अचानकच ओरडायला लागली.  तर एका महिला यूजरने ट्विटरवर लिहिले की, ‘कोणत्याही महिलेने तिच्यासोबत छेडछाड झाल्याचे म्हटल्यास आपण लगेचच डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवायला नको. कारण अशा महिला कायदाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. महिला सशक्तीकरणाच्या नावे स्वत:चा फायदा करून घेण्याचा विचार करतात. जसे सर्व पुरुष वाईट नसतात तसेच सर्व महिला चांगल्या नसतात.’ दरम्यान, विस्ताराच्या या रिपोर्टनंतर आता जायरा प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून, तिने केलेल्या आरोपांविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.