Join us  

90च्या दशकतला 'हा' चेहरा दिसणार प्रभासच्या साहोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 8:28 AM

बाहुबलीच्या यशानंतर प्रभासचे फॅन्स त्याचा आगामी चित्रपट साहोची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत.चित्रपटाचा ट्रेलर 'बाहुबली2' सोबतच रिलीज करण्यात आला आहे. ...

बाहुबलीच्या यशानंतर प्रभासचे फॅन्स त्याचा आगामी चित्रपट साहोची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत.चित्रपटाचा ट्रेलर 'बाहुबली2' सोबतच रिलीज करण्यात आला आहे. साहोचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाचा पसंत पडला आहे. या चित्रपटात नील नितिन मुकेश नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे हे तुम्हाला आम्ही आधीच सांगितले आहे. मात्र यात बॉलिवूडमधला 90च्या दशतकातला आणखीन एक चेहरा दिसणार आहे. एक वृत्त पत्रात आलेल्या बातमीनुसार चंकी पांडे या चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे. साहो ची स्क्रिप्ट चंकी पांडेला आवडली आहे. यात चंकीची भूमिका खास असणार आहे.  या चित्रपटाचे बजेट 150 कोटींचे आहे त्यामुळे चित्रपटाचे शूट ही भव्य स्तरावर होणार आहे. साहोची टीम चित्रपटाच्या शूटिंगसाठी आबुधाबीसह अनेक ठिकाणींची पाहाणी करणार आहे. साहोसाठी पुन्हा एकदा अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव सगळ्यात आघाडीवर आहे. अनुष्काच्या वाढलेल्या वजनामुळे तिला चित्रपटातून डच्चू देण्यात आल्याचे समजते होते. त्यानंतर श्रद्धा कपूरला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते मात्र श्रद्धाने मोठी रक्कम मागितल्यामुळे मेकर्सने तिला नकार दिला. बाहुबली 2मध्ये प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांना पडद्यावर आवडली. या दोघांमधील केमिस्ट्री बघण्यास प्रेक्षक पुन्हा उत्सुक आहेत. त्यामुळे आता प्रभासच्या अपोझिट कोणत्या अभिनेत्रीला पसंती दिली जाईल हे लवकरच कळेल. ALSO READ : UNBEARABLY HOT : ​ही आहे, ‘साहो’मधील प्रभासच्या नव्या लूकची एक झलक!  साहो हा अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे.चित्रपटाच्या शूटिंगची तयारी मोठ्या जोरात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच साहोतला प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. 2018मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे समजते आहे.