शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात (Mumbai rave party drugs case, Aryan Khan arrest) अटक झाल्यापासून आर्यन खान सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. काही जण त्याच्या बाजूने किल्ला लढवत आहेत तर काही जण त्याच्या विरोधात बोलत आहेत. एक वर्ग मात्र ही संधी साधून चुकीच्या बातम्या पेरण्यात बिझी आहे. सध्या आर्यन व शाहरूखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, कोर्टाच्या आवारात शाहरूखने आर्यनला मिठी मारल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. (Shah Rukh Khan hugs his son Aryan Khan in court?)एक काळ्या रंगाच्या एथलीजर ड्रेसमधील व्यक्ती आर्यन खानसारखा दिसणा-या मुलाला अलिंगन देत आहे, असा हा व्हिडीओ आहे. अलिंगन देणाºया व्यक्तिने मागे पोनी टेल बांधली आहे. व्हिडीओतील ही व्यक्ति शाहरूख खान असल्याचा दावा केला जातोय. एनसीबीने आर्यन खानला कोर्टात हजर केलं, त्यावेळी शाहरूखने आर्यनला अशी गच्च मिठी मारली, असा दावा हा व्हिडीओ शेअर करत केला जातोय.
काय आहे व्हिडीओमागचे सत्यव्हिडीओत पोनी टेल बांधलेली व्यक्ति शाहरूख खान असून निळ्या जॅकेटमधील मुलगा आर्यन खान आहे, असा दावा होतोय खरा. पण यात काहीही तथ्य नाही. होय, सोशल मीडियावर वा-याच्या वेगानं व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फेक आहे. म्हणजेच, व्हिडीओत ना शाहरूख आहे, ना आर्यन खान. अशाच निळ्या रंगाचं जॅकेट घालून आर्यन एनसीबी अधिका-यांसोबत दिसला होता. पण व्हिडीओतील निळ्या जॅकेटमधील मुलगा आर्यन नाही. कारण कोर्टाच्या परवानगीशिवाय आरोपी व्यक्तिंना भेटण्याची परवानगी नसते. ती सुद्धा अशा पद्धतीने कुठल्याही सुरक्षेविना व सार्वजनिकरित्या भेटणं अशक्य आहे. शाहरूखच्या फॅन्सपैकी कुणीतरी हा व्हिडीओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल झाला.न्यायालयाने आर्यनला भेटण्याची परवानगी देत, संबंधित व्यक्तिचं नाव मागितलं होतं. त्यावेळी आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी आर्यनला भेटणा-या कौटुंबिक सदस्याच्या रूपात शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीचं नाव दिलं होतं. काल आर्यन खानच्या कोठडीबाबत सुनावणी सुरु असताना शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी तिथे उपस्थित होती. पूजा सतत रडत होती. आर्यनची झालेली अवस्था तिला पहावत नव्हती.