मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत क्रिकेट सुरेश रैनासह 27 सेलिब्रेटी आणि 7 स्टाफ मेंबर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई केली गेली आहे.या पार्टीत अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझैन आणि गायक गुरु रंधावाही सामील हेते. याप्रकरणात नाव आल्यानंतर सुजैन चर्चेत आली आहे.
इंटिरियर डिझायनर आहे सुजैन सुजैन एक इंटिरियर आणि फॅशन डिझायनर आहे. तिचा जन्म 26 ऑक्टोबर 1978 रोजी मुंबईमध्ये झाला होता. बॉलिवूड अभिनेता संजय खान आणि झरीन यांची ती मुलगी आहे. सुझानला दोन मोठ्या बहिणी आहेत - सिमोन आणि फराह तर अभिनेता जायद खान तिचा धाकटा भाऊ आहे.
1995 मध्ये अमेरिकेच्या ब्रूक्स कॉलेजमधून सुजैनने इंटिरियर डिझायनिंगची पदवी घेतली. २०११ मध्ये तिने शाहरुख खानची पत्नी गौरीबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि मुंबईतील चारकोल प्रोजेक्ट फाउंडेशनची सुरूवात केली. भारतातील पहिले इंटिरियर फॅशन डिझाईन स्टोअर आहे.
हृतिक रोशनसोबत लग्न झाले होतेसुझान ही हृतिक रोशनची एक्स वाईफ आहे. चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2000 मध्ये लग्न केले. हृतिकने ट्रॅफिक सिग्नलवर सुजैनला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्याने सुजैनला शोधले आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिला प्रपोज केले. सुजैनने ही होकर दिला होता. बरेच दिवस डेटिंगनंतर दोघांनी 20 डिसेंबर 2000 रोजी लग्न केले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर 2006 मध्ये ऋहान जन्म झाला आणि 2008 मध्ये ऋदानचा जन्म झाला.
ह्रतिक-सुजैनचा घटस्फोटहृतिक आणि सुझैनच्या लग्नात कधी दुरावा आले हे कोणालाच कळले नाही. 13 डिसेंबर 2013 रोजी दोघांनी 17 वर्षांचे नातं संपवले. एका स्टेंटमेंटमध्ये ह्रतिक-म्हणाला, "सुजैन आणि मी 17 वर्षांचे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा अत्यंत तणावपूर्ण काळ आहे आणि मी मीडियाला आमच्या प्रायव्हेसीमध्ये हस्तक्षेप न करण्याची विनंती करतो."
मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकने घटस्फोटानंतर सुजैनला पोटगी म्हणून 380 कोटी रुपये दिले होते. जरी हृतिक-सुजैनने जरी हे नकार होते. परंतु या दोघांचा घटस्फोट हा देशातील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचे म्हटले जाते.