सुशांतची आत्महत्याच! या तथ्यांमुळे मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:38 PM2020-09-02T13:38:12+5:302020-09-02T13:39:19+5:30

वाचा, काय म्हणाले माजी पोलिस आयुक्त

Facts in Sushant Singh Rajput’s case are clear, it was suicide: Ex-Mumbai Police chief Julio Ribeiro | सुशांतची आत्महत्याच! या तथ्यांमुळे मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी केला दावा

सुशांतची आत्महत्याच! या तथ्यांमुळे मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी केला दावा

googlenewsNext
ठळक मुद्देआजघडीला सर्व पोलिस दलांवर राजकारण्यांचा दबाव असतो, हे मान्य. पण या प्रकरणात मुंबई पोलीस दबावाखाली काम करत नव्हते, याबद्दल मला खात्री नाही, असेही ते म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. मात्र सुशांतची हत्या झाली, याचा अद्याप एकही पुरावा मुंबई पोलिस वा सीबीआयला सापडलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी आता एक मोठा दावा केला आहे.  सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच होती, हे या प्रकरणातील तथ्यांवरून स्पष्टपणे दिसतेय, असा दावा त्यांनी केला आहे.
माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचीही पाठराखण केली.

काय म्हणाले रिबेरो?
सुशांत सिंग प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस अगदी योग्य पद्धतीने करत होती. त्यांचा तपास अगदी योग्य दिशेने सुरु होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले तेव्हा खरे तर आश्चर्य वाटले होते. अर्थात सर्वोच्च न्यायालयाचा तो अधिकार आहे आणि ते करू शकतात. पण मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मला कुठलीही शंका नाही. ते या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करत होते, असे ते म्हणाले.

सुशांतची आत्महत्याच
सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याचे बेडरूम आतून बंद होते. बेडरूम बंद होते, हे कोणीही खोटे कसे ठरवू शकेन? बंद खोलीचे कुलूप उघडण्यासाठी चावीवाला बोलवला गेला होता. त्याने साडेचार तास प्रयत्न केला, पण कुलूप उघडू शकले नाही. मग त्याने कुलूप तोडले. सुशांतच्या बेडरूममध्ये बाहेरील कोणीही व्यक्ती आढळली नाही. अशास्थितीत आत्महत्येशिवाय अन्य गोष्टीचा विचार कसा करू शकता? आत्तापर्यंतच्या तपासातील सर्व तथ्य ही आत्महत्याच होती, हे स्पष्ट करणारे आहेत. या तथ्यांवरून तरी ही आत्महत्याच होती, असे स्पष्ट दिसतेय, असेही ते म्हणाले.

दबाव नव्हताच
आजघडीला सर्व पोलिस दलांवर राजकारण्यांचा दबाव असतो, हे मान्य. पण या प्रकरणात मुंबई पोलीस दबावाखाली काम करत नव्हते, याबद्दल मला खात्री नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Facts in Sushant Singh Rajput’s case are clear, it was suicide: Ex-Mumbai Police chief Julio Ribeiro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.