फवाद खानने का दिला आलिया भट्टला किस करण्यास नकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2017 10:31 AM
गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘कपूर अँड सन्स’मध्ये फवाद खान चांगलाच भाव खाऊन गेला. त्यावेळी अशी चर्चा होती की, त्याने ...
गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘कपूर अँड सन्स’मध्ये फवाद खान चांगलाच भाव खाऊन गेला. त्यावेळी अशी चर्चा होती की, त्याने आलिया भट्टला किस करण्यास नकार दिला होता. इंडस्ट्रीमधील हॉट आणि टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या चुलबुली आलियाला तो नकार देतो म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले होते.शकून बत्रा लिखित-दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि फवादचा एक लिप-लॉक किस होता. हे कळाल्यावर तर त्याने तसे करण्यास साफ नकार दिला. खूप मनधरणी केल्यानंतर तो लिप-लॉकऐवजी केवळ चीट-किस करण्यास तयार झाला.या बातमीवर खुद्द आलियानेच शिक्कामोर्तब केले आहे. नुकतेच एका कार्यक्रमात तिने सांगितले की, मी फवादला किस करणार असा सीन होता. पण मी जेव्हा त्याला किस करण्यासाठी जायचे तेव्हा तो मागे जायचा. अनेकदा असेच झाले. जणुकाही किस करायला तो घाबरतो. खूप विश्वासात घेऊन त्याला समजावुन सांगावे लागले की, मी त्याच्या पावित्र्याला धक्का न पोहचविण्याची पूर्ण काळजी घेईल.पाकिस्तानी कलाकार फवाद ज्या संस्कृतित वाढलेला आहे त्यानुसार तो मोठ्या पडद्यावर सेक्शुअल रोमॅण्टिक सीन करण्यास नकार देतो. यापूर्वी त्याने डेब्यु फिल्म ‘खुबसुरत’मध्ये सोनम कपूरला अशाच प्रकारे किस करण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्याने स्पष्टीकरण दिले होते की, ‘माझा जो मूळ प्रेक्षकवर्ग आहे त्यांच्या भावना मला दुखवायच्या नाहीएत. त्याच्या भावनांचा आदर करणे मी माझे कर्तव्य मानतो. मी जर असे सेन्शुअस सीन करू लागलो तर त्यांना नक्कीच धक्का बसेल. नो किसिंग : सोनम कपूर आणि फवाद खानमग भविष्यातही कधी आॅन-स्क्रीन किस करणार नाही का? या प्रश्नावर तो म्हणाला होता की, पुढे काय लिहून ठेवले ते कोणाला माहित. मी किस करणारच नाही अशी शपथ थोडी घेतलीय! म्हणजे चित्रपटाला थोडे मसालेदार बनविण्यासाठी अशा गोष्टींची गरज असते हे मान्य; परंतु मला निरागस रोमान्स जास्त आवडतो. बोलण्यातून, इशाऱ्यातून प्रेम व्यक्त करणे मी पसंत करतो. बाकी सगळे प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून द्यायचे.‘कपूर अँड सन्स’मध्ये फवाद खानने एका समलैंगिक व्यक्तीची भूमिका केली होती. सिनेमात त्याच्याबरोबर आलिया, सिद्धार्थ मल्होत्रा, ऋषी कपूर, रत्ना पाठक शहा आणि रजत कपूर होते. ‘उरी हल्ल्या’नंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूड चित्रपटात काम करू देऊ नका म्हणून आंदोलन झाले. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील त्याची भूमिका मोठ्या प्रमाणात कापण्यात आली होती.cnxoldfiles/span>येथे राहिल्यास परिणाम वाईट होतील अशी, धमकीदेखील देण्यात आली. अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे फवादने निषेध करावा अशी मागणीदेखील केली जात होती.