अपयशी कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM
. चित्रपट व्यावसायिक जाणकारांनी जज्बाच्या व्यवसायास अपेक्षापेक्षा निराश करणारा म्हटले आहे.त्यामुळे सध्यातरी ऐश्वर्याच्या पुनरागमनाला यशस्वी मानले जाऊ शकत ...
. चित्रपट व्यावसायिक जाणकारांनी जज्बाच्या व्यवसायास अपेक्षापेक्षा निराश करणारा म्हटले आहे.त्यामुळे सध्यातरी ऐश्वर्याच्या पुनरागमनाला यशस्वी मानले जाऊ शकत नाही. तसे पाहता त्यांच्याजवळ अजून एक संधी आहे. करण जाैहर यांच्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात रणबीर कपूरसोबत ती दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, बर्याच काळानंतर करण जाैहर यांनी दिग्दर्शकाची जबाबदारी संभाळली आहे. चित्रपट पूर्ण होईपर्यंत याबाबत ऐश्वर्याच्या पुढील पुनरागमनाचा विषय येथेच थांबवावा लागेल. चित्रपट प्रदर्शनावेळी हा प्रश्न पुन्हा नव्याने समोर येणार आहे.सध्याच्या काळात हे तिसर्या मोठय़ा अभिनेत्रीचे पुनरागमन आहे. जज्बाच्या एक आठवड्यापूर्वी अक्षय कुमारचा सिंग इज ब्लिंग चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात लारा दत्ता दिसली, मात्र ती अक्षयची अभिनेत्री नव्हती, तर ती साईड रोलमध्ये होती. पडद्यावर तिच्या कामगिरीस नक्की पसंत केले गेले, मात्र पुनरागमनाबाबत जास्त काही चर्चा झाली नाही. त्यापूर्वी अजय देवगनच्या दृश्यममध्ये तब्बूला मोठय़ा काळानंतर पाहिले गेले. तीदेखील अजयची अभिनेत्री नव्हती, तर पोलीस अधिकार्याच्या वेगळ्य़ा भूमिकेत दिसली.चित्रपट थोडाफार चालला, मात्र तब्बूचे पुनरागमनही कोणत्याच प्रकारे धमाकेदार राहिले नाही. नुकतेच तब्बूने मेघना गुलजार यांच्या तलवार चित्रपटात पाहुण्या कलाकारची भूमिका केली होती, ज्याचा थेट चित्रपटाच्या कथेशी काहीही संबंध नव्हता.तलवारमध्ये तब्बूची भूमिका केवळ इरफानच्या भूमिकेला मजबूत करण्यासाठी होती हे स्पष्ट आहे की तलवारला जे यश मिळाले, त्यात तब्बूच्या योगदानाची काहीच चर्चा नव्हती. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जर या मोठय़ा अभिनेत्रींचे पुनरागमन फिके राहिले तर दुसर्या अभिनेत्रींच्या अपेक्षांचे काय होईल, ज्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत.कंगनाच्या तनू वेंडस् मनू रिटर्नच्या यशासोबत उर्मिला मातोंडकरपासून ईशा कोप्पीकर आणि सुष्मिता सेन यांच्या पुनरागमनाच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे, मात्र सध्याची स्थिती पाहता असेच वाटते की, हे अंदाज पुढे काही सरकरणार नाही.एका गॅप नंतर कोणत्याही मोठय़ा अभिनेत्रींच्या पुनरागमनाच्या इतिहासात अनेक अशा अभिनेंत्रींचे नाव आहे, ज्यांच्या हाती निराशाच आली आहे.आजा नचले तून पुनरागमन करणार्या माधुरी दीक्षितची धक धक इमेजदेखील तिच्यासाठी यशस्वी ठरु शकली नाही, तर जूही चावलानेदेखील पुनरागमानासाठी अनेक प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत.