Join us

जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ विरोधात सोशल मीडियावर अशीही मोहिम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 12:24 PM

हिंदी सिनेमाची ताकद बनू पाहणारा सोशल मीडिया आता त्याविरोधातच वापरला जातोय. हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या चित्रपट समीक्षकांचे फोटो लावून बनावट ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण पोस्ट करण्याचा एक नवा आणि अत्यंत चुकीचा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय.

ठळक मुद्देजॉनच्या ‘रोमियो, अकबर, वॉल्टर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित आहे.

हिंदी सिनेमाची ताकद बनू पाहणारा सोशल मीडिया आता त्याविरोधातच वापरला जातोय. हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या चित्रपट समीक्षकांचे फोटो लावून बनावट ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण पोस्ट करण्याचा एक नवा आणि अत्यंत चुकीचा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी शाहरूख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटाला याचा जोरदार फटका बसला. आता जॉन अब्राहमचा ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा चित्रपट या बनावट ट्विटर हँडलच्या निशाण्यावर आला आहे.गत शुक्रवारी  ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि शनिवारी रात्री मध्यरात्रीपासून या चित्रपटाविरोधात एक नियोजित मोहिम छेडली गेली. एका पाठोपाठ एक अशा ५० ते ६० ट्विटर हँडलवरून एक सारखे ट्विट केले गेले. ‘हा रहस्यमय सिनेमा वाचवणे जॉन अब्राहमच्याही हातात नाही,’ अशा आशयाचे  एकच ट्विट या सर्व फेक ट्विटर हँडलवरून केले गेले.

सोशल मीडियावर कुठलाही ट्विटर हॅशटॅग वा एखादा खास विषय ट्रेंडमध्ये आणण्यासाठी सोशल मीडिया एजन्सी आपल्या नेटवर्कची मदत घेतात.  देशाच्या वेगवेगळ्या शहरांतून हे नेटवर्क काम करते. जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटाविरोधात सुरु झालेल्या मोहिमेतही अशाच नेटवर्कचा वापर झालेला दिसतोय. यापैकी काही ट्विटमध्ये आखाती देशातून संचालित होणा-या एका पोर्टलची लिंकही दिली गेली आहे. ‘रोमिओ अकबर वॉल्टर’च्या मेकर्सनी अद्याप यासंदर्भात तक्रार दाखल केलेली नाही.जॉनच्या ‘रोमियो, अकबर, वॉल्टर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. जॉन अब्राहम  यात १८-२० वेगवेगळ्या लूकमध्ये   आहे. मौनी रॉय आणि जॅकी श्रॉफ यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा लिहिली असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

टॅग्स :जॉन अब्राहमरोमिओ, अकबर, वॉल्टर