Join us

Video : बोलता बोलता अचानक रडू लागली फाल्गुनी पाठक; ‘मिस’ करतेय नवरात्री इव्हेंट

By रूपाली मुधोळकर | Published: October 21, 2020 3:17 PM

यंदा कोरोना महामारीमुळे यंदा ना लाईव्ह इव्हेंट, ना रात्ररात्र रंगणा-या दांडिया नाईट्स, ना बेभान चाहते. या नवरात्रीत फाल्गुनी हे सगळे प्रचंड मिस करतेय.

ठळक मुद्देचाळीशी पार असलेली फाल्गुनी पाठक हिला नवरात्रीच्या मौसमात प्रचंड मागणी असते. अगदी गुजरातपासून तर साता समुद्रापार लोक तिला बोलवतात.

नवरात्र आणि गरबा हे एक अतुट समीकरण आहे. तसेच गरबा आणि फाल्गुनी पाठक असेही एक समीकरण आहे. ती नाही तर किमान तिची गाणी प्रत्येक दांडिया नाईट्समध्ये हमखास वाजतात आणि तरूणाई तिच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचते. लाईव्ह परफॉर्मन्स इतके की, नवरात्रीच्या दिवसांत फाल्गुनीला उसंत नसते. पण यंदा कोरोना महामारीमुळे अख्खे समीकरणच बिघडले. यंदा ना लाईव्ह इव्हेंट, ना रात्ररात्र रंगणा-या दांडिया नाईट्स, ना बेभान चाहते. या नवरात्रीत फाल्गुनी हे सगळे प्रचंड मिस करतेय. इतके की, तिला बोलता बोलता अश्रू अनावर झालेत.होय, फाल्गुनीने तिच्या सोशल अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत फाल्गुनीने चाहत्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात आणि या शुभेच्छा देता देता ती इतकी भावूक झाली की, अक्षरश: रडू लागली. तिला अश्रू अनावर झालेत. मित्रांनो, तुम्ही मला खूप मिस करताहात, तशी मी सुद्धा तुम्हाला मिस करतेय, असे म्हणतात अनेकदा तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

चाळीशी पार असलेली फाल्गुनी पाठक हिला नवरात्रीच्या मौसमात प्रचंड मागणी असते. अगदी गुजरातपासून तर साता समुद्रापार लोक तिला बोलवतात. दांडिया नाईट्सच्या एका परफॉर्मन्ससाठी फाल्गुनी कोट्यवधी रूपये घेते. दोन वर्षांपूर्वी एका परफॉर्मन्सासाठी ती दीड कोटी रुपए घ्यायची. सुरुवातीच्या काळात ही रक्कम दोन ते तीन कोटीच्या घरात होती.  

गुजरातच्या एका मध्यवर्गीय कुटुंबात फाल्गुनीचा जन्म झाला. घरात फाल्गुनी पाचवी. तिच्या आधी चार मुली होत्या. पाचव्यांदा आई-वडिलांना मुलगा हवा होता. पण झाली मुलगीच. मग काय, आईवडिलांनी फाल्गुनीलाच मुलगा म्हणून वाढवले. मुलाचे कपडे, बॉयकट असे सगळे.चौथीत असताना घराजवळच्या दांडियामध्ये कोरसमध्ये गायला उभी झालेली फाल्गुनी अचानक गाणे सुरु झाल्यावर ठेका पकडून नाचू लागली. तिचा तो अंदाज पाहून पब्लिक बेभान झाली. मग काय, आयोजकांनी तिला एकटीचा परफॉर्मन्स ठेवला आणि काय आश्चर्य फाल्गुनीने दांडियाची ती रात्र अक्षरश: गाजवली.

पुढे फाल्गुनीला ऑर्केस्ट्रामधून बोलवले आले. पण बाबांनी थेट नकार दिला. फाल्गुनीने काय करावे तर सर्वांची नजर चुकवून ती रात्री ऑर्केस्ट्राला गेली. बाबांनी चोप दिला. पण ते फाल्गुनीला थांबवू शकले नाहीत. दहा वर्षांची असताना तिला एका गुजराती सिनेमात गाण्याची संधी मिळाली आणि तिथून दांडिया आणि फाल्गुनी असे जणू समीकरण रूढ झाले. मुंबईपासून तिला दांडिया नाईट्ससाठी बोलवणे येऊ लागले.

‘या’ छोकरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीये का? एका दांडिया नाईट्ससाठी घेते इतके पैसे

टॅग्स :फाल्गुनी पाठककोरोना वायरस बातम्या