Join us

फॅमिली मॅन 2 बद्दल निर्मात्यांकडून करण्यात आला मोठा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:55 PM

फॅमिली मॅन 2 ही वेबसिरिज 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती. पण काही कारणांनी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. त्यामुळे या वेबसिरिजबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

ठळक मुद्देफॅमिली मॅन 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणारच नाही असे देखील म्हटले जात होेते. वेब कन्टेन्टवर लावलेल्या नव्या निर्बंधांमुळे ‘फॅमिली मॅन २’ प्रदर्शित होणार नाही अशी चर्चा रंगली होती. पण यावर अखेरीस निर्मात्यांनी मौन सोडले आहे. या निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी म्

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजला सप्टेंबरमध्ये एक वर्षं पूर्ण झाल्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची दमदार अंदाजात घोषणा केली होती. दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समांथा अक्किनेनीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरिजच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे.

फॅमिली मॅन 2 ही वेबसिरिज 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती. पण काही कारणांनी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. त्यामुळे या वेबसिरिजबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. फॅमिली मॅन 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणारच नाही असे देखील म्हटले जात होेते. वेब कन्टेन्टवर लावलेल्या नव्या निर्बंधांमुळे ‘फॅमिली मॅन २’ प्रदर्शित होणार नाही अशी चर्चा रंगली होती. पण यावर अखेरीस निर्मात्यांनी मौन सोडले आहे. या निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक राज आणि डिके यांनी सोशल मीडियावर त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे की, तुम्ही सगळे फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहात आहात हे मला माहीत आहे. तुमच्या या प्रेमाबाबत मी तुमचे आभार मानतो. फॅमिली मॅनचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिझन अधिकाधिक चांगला असावा यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत. हा देखील सिझन तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. 

ही वेबसिरिज हिंदीसोबतच भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये डब केली जाणार आहे. तसेच अनेक विदेशी भाषांमध्ये देखील ही वेबसिरिज डब करण्यात येणार आहे. 

द फॅमिली मॅन वेबसीरिजमधून मनोज वाजपेयीने डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. यात त्याने श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली होती. तो एक सीक्रेट एजेंट आहे. त्याच्या घरातल्यांसाठी तो एक सामान्य व्यक्ती आहे. तो काय काम करतो हे त्याच्या घरातल्यांना देखील माहीत नाहीये. या वेबसिरिजमध्ये मनोज वाजपेयीसोबत शारीब हाश्मी, नीरज माधव, प्रियामणी, शरद केळकर आणि गुल पनाग हे कलाकार आहेत.

टॅग्स :मनोज वाजपेयी