बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) रिलीज झाली आणि फॅन्स क्रेझी झालेत. ही सीरिज कधी येणार याचीच वाट प्रेक्षक पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा निर्मात्यांनी दोन तास आधीच संपवली. होय, सीरिज 4 जून 2021 रोजी मध्यरात्री म्हणजेच बाराच्या ठोक्याला प्रदर्शित होणार होती. परंतु निर्मात्यांनी गुरुवारी रात्री 10 च्या सुमारासच सीरिज रिलीज केली. सीरिज निर्धारित वेळेपेक्षा 2 तास आधीच सीरिज रिलीज झाली आणि रिलीज होताच, चाहत्यांनी अगदी रात्रभर जागून अख्खी सीरिज संपवली. मग काय तर ट्विटरवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला.
अनेकांनी निर्धारित वेळेपेक्षा 2 तास आधी सीरिज रिलीज केल्याबद्दल अॅमेझॉन प्राइमचे आभार मानले तर इतरांनी पहिल्या एपिसोडचा स्क्रीनशॉट शेअर करण्याचा सपाटा लावला. दिवस उगवला तसा, चाहत्यांच्या रिव्ह्यूचा सोशल मीडियावर जणू पूर आला. बहुतांश चाहत्यांनी जबरदस्त, दमदार अशा प्रतिक्रिया दिल्या. मनोज वाजपेयी आणि सामंथा अक्कीनेनीचा (Samantha Akkineni)अभिनय पाहून चाहते भारावून गेलेत. विशेषत: साऊथ स्टार सामंथाने पॉवरफुल अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकलीत. सामंथाने अपेक्षेपेक्षाही दमदार परफॉर्मन्स दिला, अगदी तिने अख्खा सीझन खाऊन टाकला आहे, अशा अनेक प्रतिक्रिया टिष्ट्वटरवर उमटल्या. पाहुया चाहत्यांच्या काही प्रतिक्रिया...
‘द फॅमिली मॅन २’ मध्ये मनोज बाजपेयीने एजंट आणि विश्लेषक श्रीकांत तिवारीची भूमिका वठवली आहे. तर सामंथा अक्कीनेनी ही तामिळ बंडखोराच्या भूमिकेत आहे. मनोज आणि सामंथाशिवाय शरीब हाशमी, नीरज माधव, पवन चोप्रा, प्रियामनी, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
असे आहे कथानकश्रीलंकन तमिळ बंडखोर आणि त्यांना असलेली आयएसआयची फूस या पार्श्वभूमीवर ‘द फॅमिली मॅन 2’च्या दुस-या सीझनचे कथानक उलगडत जाते. श्रीकांत तिवारी एनआयएची नोकरी सोडून आयटी कंपनीत नोकरी पत्करतो. घरात बायकोला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मनातली घुसमट त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याचे मन अजूनही एनआयएमध्येच असते. अशात दक्षिणेत तमिळ बंडखोर राजी म्हणजे राजलक्ष्मी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. श्रीकांत तिवारी हे थांबविण्यासाठी परत एनआयएमध्ये जातो आणि इथूनच कथा पुढे सरकते.