‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या वेबसीरिजमधील ‘सुची’ अर्थात साऊथची अभिनेत्री प्रियामणी (Priyamani ) हिच्या लग्नावरून नवा वाद उभा झाला आहे. प्रियामणीने 2017 साली मुस्तफा राजसोबत (Mustafa Raj) लग्न केले होते. मात्र या लग्नाला मुस्तफाची पहिली पत्नी आयशा हिने कोर्टात आव्हान दिले आहे. मुस्तफा व प्रियमणीचे लग्न अवैध आहे, असा दावा तिने केला आहे. मी मुस्तफाची पहिली पत्नी आहे. दुस-या लग्नाआधी त्याने मला कायदेशीररित्या घटस्फोट दिलेला नाही, असेही तिने म्हटले आहे.
मुस्तफा अजूनही माझा पती...आयशा ही मुस्तफाची पहिली पत्नी आहे. दोघांना दोन मुलं आहेत. आयशाने मुस्तफावर घरगुती हिंसाचाराचा गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरणही कोर्टात सुरू आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आयशाने मुस्तफा अजूनही माझा पती असल्याचा दावा केला.‘ त्याने प्रियामणीसोबत लग्न केले तेव्हा आम्ही घटस्फोटाचा अर्जही दाखल केला नव्हता. मी बॅचलर असल्याचे त्याने कोर्टात सांगितले होते. तो अजूनही माझा पती आहे ’असे आयशा म्हणाली.
म्हणून मी आत्तापर्यंत शांत होती...इतकी वर्ष या लग्नाबद्दल का बोलली नाहीस? असे विचारले असता आयशा म्हणाली, मी दोन मुलांची आई आहे. दोन मुलांची आई काय करू शकणार होती? मी हे प्रकरण शांततेत निकाली काढू इच्छित होते. पण तसे काहीही घडताना दिसत नव्हते. अशास्थितीत मला बोलणे भाग होते. कारण तुम्ही सर्व काही गमावू इच्छित नाही.
मुस्तफा म्हणाला, सर्व आरोप खोटेमुस्तफाने पहिली पत्नी आयशाचे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. माझ्याविरूद्धचे सर्व आरोप खोटे आहेत. मी आयशाला नियमितपणे मुलांच्या संगोपणासाठीचा खर्च देत आहे. आता फक्त तिला माझ्याकडून पैसे वसूल करायचे आहेत. मी व आयशा 2010 पासूनच विभक्त झालो होतो आणि 2013 मध्ये आमचा घटस्फोट झाला होता. माझे व प्रियामणीचे लग्न 2017 मध्ये झाले. मग ती इतकी वर्ष शांत का बसली? असा सवालही त्याने केला.
कोण आहे प्रियामणी?
प्रियामणी साऊथच्या बड्या स्टार्सपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेससाठी ती ओळखली जाते. बॉलिवूडच्या एक-दोन चित्रपटांत प्रियामणी दिसली खरी. बॉलिवूडच्या काही आयटम साँगमध्येही ती दिसली. पण बॉलिवूडमध्ये ती फार काही खास करू शकली नाही. प्रियामणीचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव अय्यर आहे. शाळेच्या दिवसांतच तिने कांचीवरम सिल्क आणि इरोड सिल्कसाठी मॉडेलिंग केली होती. 12 वीत असतानाच तामिळ दिग्दर्शक भारतीराजा यांनी तिला चित्रपटसृष्टीत लॉन्च केले होते. यानंतर प्रियामणी ने कधीच मागे वळून बघितले नाही. शाहरूख खानचा चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ यातील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यात तिने कॅमिओ केला होता. मणिरत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमात ती अभिषेक बच्चनसोबत दिसली होती. गेल्यावर्षी ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये ती दिसली. यात तिने मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) पत्नीची भूमिका साकारली होती. लवकरच ती अजय देवगणच्या ‘मैदान’ या सिनेमात ती दिसणार आहे.