Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कंगना रणौतसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:41 IST

Mallika Rajput Suicide: प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी केली आत्महत्या

अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूतचा (Mallika Rajput) संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुलतानपूर येथील घरी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तिने आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत तपासणी केली. तसंच शवविच्छेदनासाठी मल्लिकाचं पार्थिव पाठवलं. सध्या पोलिस तपास करत असून मल्लिकाने हे पाऊल उचलण्याचं काय कारण होतं याचा शोध घेत आहेत.

मल्लिका राजपूतच्या आईने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, 'ती नेहमीप्रमाणे रात्री तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. सकाळी बराच वेळ झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नाही म्हणून दरवाजा तोडण्यात आला.  तेव्हा ती पंख्याला लटकलेली आढळली. प्रत्येक घरात जशी चर्चा होते तसंच आमच्यात रोज बोलणं व्हायचं. मात्र 

मल्लिका राजपूतने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबत काम केलं आहे. कंगना रणौतच्या 'रिव्हॉल्व्हर रानी' मध्ये ती दिसली. तिला गायक शानचा अल्बम 'यारा तुझ से' मुळे प्रसिद्धी मिळाली होती. याशिवाय की काही सीरिज, अल्बम आणि मालिकेत दिसली. याशिवाय तिने राजकारणातही एन्ट्री घेतली होती. भाजपात ती सामील झाली होती. 2018 मध्ये तिने बलात्काऱ्यांचं समर्थन करतात असं म्हणत पक्षावर आरोप लावला होता आणि तिने पक्ष सोडला. अभिनय आणि राजकारणमध्ये नशीब चाललं नाही म्हणून ती आध्यात्माकडे वळली. तिने कपाली महाराड गृहस्थ संन्यासची दीक्षा घेतली होती. 

मल्लिकाच्या आत्महत्येनंतर अनेक जण धक्क्यात आहेत. माध्यम रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचा घरातील सदस्यांसोबत वाद झाला होता. यामध्ये पोलिसांनाही बोलावण्यात आलं होतं. तेव्हा पोलिसांनी त्यांचं भांडण सोडवलं होतं. त्यामुळे आता तिच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :मृत्यूसेलिब्रिटीकंगना राणौतबॉलिवूड