Join us

Kollam Sudhi Death : प्रसिद्ध अभिनेत्याचं कार अपघातात निधन, वयाच्या ३९ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 11:29 IST

मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी

मनोरंजनसृष्टीत सध्या एकामागोमाग एक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. मागील काही दिवसात वैभवी उपाध्याय पासून ते आमिर रजा हुसैन पर्यंत अनेक सेलिब्रिटींचं निधन झालं. आता साऊथमधून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी (Kollam Sudhi) यांचं वयाच्या ३९ व्या अपघातात निधन झालं आहे. 

कालच कन्नड अभिनेता नितीन गोपी (Nitin Gopi) यांचं वयाच्या ३९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. तर आज मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांचंही वय केवळ ३९ वर्ष होतं. आज पहाटे कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

प्रसिद्ध कलाकार आणि टेलिव्हिजन अभिनेता कोल्लम सुधी यांची कार समोरुन वेगाने येणाऱ्या एका कॅरिअरला धडकली. हा अपघात इतका भयानक होता की अभिनेत्याच्या डोक्यालाच मार लागला. तात्काळ त्यांना थिसुरच्या कोडुंगल्लूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी वेगाने व्हायरल झाली. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता कोल्लम सुधी अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रसिद्ध होते. त्यांनी 'कंथारी' या २०१५ साली आलेल्या सिनेमातून केली होती. याशिवाय त्यांनी 'कट्टप्पानायिले ऋत्विक रोशन','कुट्टानदन मारप्पा','थिएटा रप्पाई''वाकाथिरिवु','एन इंटरनॅशनल लोकल स्टोरी','एस्केप','केसु ई वेदीन्ते नाधन' आणि 'स्वर्गथाइल कट्टुरुम्बु' अशा काही सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मृत्यूअपघात