Join us

'इश्क बुलावा' फेम गायक सनम पुरी अडकला लग्नबंधनात, नागालँडमध्ये पार पडलं ग्रँड वेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:24 IST

तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या गायक सनम पुरीचं झालं लग्न

आपल्या आवाजाने आणि गायकीने चाहत्यांना प्रेमात पाडणारा प्रसिद्ध गायक सनम पुरी (Sanam Puri) नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड जुचोबेनी तुंगो सोबत  त्याने नागालँड येथे लग्न केले. काल ११ जानेवारी रोजी रिती-रिवाजानुसार त्यांचे लग्न झाले. 'इश्क बुलावा' गाण्यावर सनमच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ख्रिश्चन पद्धतीने दोघंही लग्नबंधनात अडकले. 

इन्स्टाग्रामवर सनम पुरीच्या लग्नाच्या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. सध्या चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सनम पुरीने ब्लॅक सूट घातला आहे ज्यामध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. तर जुचोबेनीने व्हाईट रंगाचा गाऊन परिधान केला आहे. स्टेजवर सनम पुरीजवळ त्याचा भाई समरही दिसत आहे. सनम पुरीच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

सनम पुरीचं युट्यूब चॅनल आहे ज्यावर त्याचे 11 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. बॉलिवूडची अनेक आयकॉनिक गाणी तो आपल्या आवाजात रिक्रिएट करतो. त्याच्या आवाजाचे सर्वच दिवाने आहेत. याशिवाय सनमने 'धत तेरी की', 'इश्क बुलावा' सारखी सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याचा पॉप रॉक बँड आहे ज्यामध्ये तो मुख्य गायक आहे. चाहते सनमला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देत आहेत. 

सनमची पत्नी जुचोबेनीबद्दल सांगायचं तर ती देखील गायिका आहे आणि मॉडेलिंगही करते. दोघंही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेत जन्मोजन्मीचं नातं जोडलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीलग्ननागालँडबॉलिवूड