Join us

वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्री झाली आई; जुळ्या मुलांना दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:00 IST

Namita Vankawala: दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नमिता वांकावाल चौधरी नुकतीच आई झाली आहे.

सध्या कलाविश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहेत. यात अलिकडेच एका लोकप्रिय अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे वयाच्या ४१ व्या वर्षी ही अभिनेत्री आई झाल्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही गुडन्यूज शेअर केली आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नमिता वांकावाल चौधरी (Namita Vankawala Chowdhary) नुकतीच आई झाली आहे. नमिताने कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी तिच्या जुळ्या मुलांना जन्म दिला. नमिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. तसंच तिच्या आणि बाळांच्या प्रकृतीचे अपडेट्सही दिले. 

'हरे कृष्णा! या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आमची आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप अत्यानंद होत आहे. आम्ही जुळ्या मुलांचे पालक झालो आहोत. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव त्याच्या पाठीशी राहील अशी आशा आहे', असं नमिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनही दिलं आहे.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रोमपेट यांचे खूप आभार. त्यांनी उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्या. माझ्या गरोदरपणात माझ्या मुलांना या जगात आणण्यासाठी मला मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. भुवनेश्वरी आणि त्यांच्या टीमची मी ऋणी आहे. डॉ. ईश्वर आणि डॉ. वेल्लू मुर्गन यांचे सुद्धा खूप खूप आभार. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा!', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटमुळे आली चर्चेत

दरम्यान, अलिकडेच नमिताने बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नमिता तेलुगू कलाविश्वातील प्रसिद्द अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा तगडा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तिने ही गुडन्यूज शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. नमिताने 2017 मध्ये वीरेंद्र चौधरीसोबत लग्न केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodबॉलिवूडसिनेमा