Join us

"सलमानबरोबर लग्न कर", ४९ वर्षीय अविवाहित अमीषा पटेलला चाहत्याचा अजब सल्ला, अभिनेत्री म्हणाली- "मी तर केव्हापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 9:51 AM

४९व्या वर्षीही सिंगल असलेल्या अमीषाला चाहत्याने सलमान खानबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. चाहत्याच्या या प्रश्नाला अमिषाने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. 

अमीषा पटेल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'कहो ना प्यार है' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. पण, २००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' सिनेमाने अमीषा प्रसिद्धीझोतात आली. यानंतर 'हमराज', 'आप मुझे अच्छे लगने लगे', 'क्या यहीं प्यार है', 'मंगल पांडे' अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली. बॉलिवूड करिअरपेक्षा अमिषाच्या अफेरच्या चर्चा रंगल्या. पण, तरीही ४९ वर्षीय अमीषा अद्याप सिंगलच आहे. यावरुनच चाहत्याने अमिषाला एक अजबच सल्ला दिल्ला आहे. 

'गदर' फेम अमीषा पटेल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच अमीषाने X अकाऊंटवरुन चाहत्यांशी संवाद साधला. तिने askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तिने उत्तरं दिली. या सेशनमध्ये ४९व्या वर्षीही सिंगल असलेल्या अमीषाला चाहत्याने सलमान खानबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. "सलमान खानने अद्याप लग्न केलेलं नाही आणि तू पण अविवाहित आहेस. आम्ही तुमचं लग्न होताना पाहून शकतो का? हे शक्य आहे का?", असं चाहत्याने म्हटलं. चाहत्याच्या या प्रश्नाला अमिषाने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. 

"सलमान आणि मी दोघेही अविवाहित आहोत. म्हणून तुला असं वाटतं की आम्ही लग्न करावं? आम्हा लग्न करावं असं तुला का वाटलं असेल...लग्न आहे की सिनेमाची स्टोरी", असं म्हणत अमिषाने चाहत्याच्या प्रश्नाला मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. "तू लग्न कधी करणार?" असा प्रश्नही एका चाहत्याने अमिषाला विचारला. याचं उत्तर देत ती म्हणाली, "मुलगाच भेटत नाहीये, मी तर कधीपासून तयार आहे...". 

दरम्यान, अमिषा आणि दिग्दर्शक विक्रम भट यांचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. जवळपास पाच वर्ष ते दोघं एकत्र होते. त्यानंतर तिचं नाव लंडनमधील बिझनेसमॅन कनव पुरी यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं. 

टॅग्स :अमिषा पटेलसलमान खानसेलिब्रिटी