सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे.ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी आहे. विशेष जगभरात सामंथाचे चाहते आहेत. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात.
सामंथाचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. मात्र कधी कधी चाहते अतिउत्साहाच्या भरात काय बोलतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर अशाच एका युजरने सामंथाला थेट पतीला घटस्फोट देवून टाक असाच सल्ला दिला आहे. या युजरच्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर सामंथाही इतर सेलिब्रेटींप्रमाणे विविध अंदाजातील तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. अशी कमेंट करणारा हा सामंथाचा चाहता आहे. तिच्या फोटोंंना नेहमीच भरभरून कमेंट आणि लाइक्स करत असतो. नविन फोटो पाहून त्याने थेट तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि पति एक्टर नागा चैतन्यला घटस्फोट देण्याचाही सल्ला दिला.
अशा विचित्र प्रश्वावर सेलिब्रिटी त्याला काय उत्तर देतील. यावर सामंथाने या युजरला निराश न करता त्याच्या या कमेंटवर रिप्लाय देत म्हटले आहे की, हे तर करणे कठिण आहे. एक काम कर चायलाच हा प्रश्न विचार. नागा चैतन्यचे टोपण नाव 'चाय' आहे. घरी त्याला सगळे लाडाने चाय याच नावाने आवाज देतात. त्यामुळे पत्नी सामंथादेखील त्याला चाय म्हणून बोलावलते.
सामंथा ही सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. 2017 मध्ये नागर्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे लग्न झाले होते. या लग्नाची प्रचंड चर्चा मीडियामध्ये रंगली होती. तब्बल दहा कोटी रुपये खर्च आलेल्या या सोहळ्याची बातच न्यारी होती.
हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धार्मिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता़ नवदाम्पत्याचा लूक, राजेशाही थाटातील सोहळा, दागदागिने आणि दिग्गजांची उपस्थिती यामुळे हा सोहळा त्या वर्षभरातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी लग्नसोहळा ठरला होता.