नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे.
सोशल मीडियावर या दिलदार सुपरहिरोचं भरभरून कौतुक केलं जात आहे. सोनू सूदच्या एका चाहत्याने चक्क सिम कार्डवर त्याचं चित्र काढलं आहे. ट्विटरवर एका युजरने याबाबत एक ट्विट केलं आहे. सिम कार्डवर सोनू सूदचा फोटो दिसत आहे. "सोनू सर, मी तुमचा फोटो सिम कार्डवर पेंट केला आहे. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही खूप ग्रेट काम करत आहात" असं देखील युजरने ट्विटमध्ये म्हटलं आहे. सिम कार्डवरील सोनू सूदचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
चाहत्याच्या ट्विटला सोनूने दिलं भन्नाट प्रतिक्रिया
अभिनेता सोनू सूदने हा फोटो आणि ट्विट पाहिलं असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. 10 G नेटवर्क असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने देखील ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या एका महिला इंजिनिअरला सोनूने नोकरीची संधी दिली. कोरोनामुळे या महिलेला आपली नोकरी गमवावी लागली. परिस्थिती बिकट असल्याने तिने हैदराबादमध्ये भाजी विकायला सुरुवात केली. शारदा असं या 28 वर्षीय महिलेचं नाव असून सोनू सूदने तिला नोकरीची ऑफर दिली.
नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात
सोनू सूदच्या टीमने शारदाची भेट घेतली आणि तिला नोकरीचं ऑफर लेटर दिलं आहे. स्वत: सोनू सूद याने आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून ही माहिती दिली. शारदाने सोनू सूदचे मदतीसाठी आभार मानले आहेत. तसेच त्याच्याप्रमाणे इतरही लोकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं देखील म्हटलं आहे. याआधीही सोनू सूद कित्येक गरजूंना सर्वोतोपरी मदत केली आहे. त्याचे हे कौतुकास्पद काम सातत्याने सुरू आहे. कोरोनाच्या संकटात तो लोकांसाठी देवदूत ठरला आहे.
सोनू प्रवाशी मजुरांना त्यांच्या गावात रोजगारही मिळवून देणार आहे. त्यासाठी तो एक अॅप घेऊन आला. याचं नाव 'प्रवासी रोजगार' आहे. याने मजुरांना रोजगार शोधण्यास मदत मिळेल. सोनू सूद हा कोरोना महामारीत लोकांसाठी मसीहा बनूनच समोर आला आहे. लोकांना घरी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर छत दिल्यानंतर आता तो गरजू लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करत आहे. 'आपल्या गावी परतल्यावर लोक आता रोजगार शोधत आहेत. सध्या काम मिळणं फार कठीण आहे. भलेही केंद्र सरकारची योजना आहे. पण लोकांना सध्या लॉंग टर्म सॉल्यूशनची गरज आहे. या मजुरांना शहरांमध्ये, गावांमध्ये कामाशी जोडणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्या गावातही त्यांच्यासाठी काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन' असं सोनूने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान
CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी
कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार
"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका