Join us

Aryan Khan : “फुल्ल ॲटिट्युड, अरे वडिलांकडून काहीतरी शिक...”, आर्यन खानचा Video पाहून नेटकरी भडकले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 3:18 PM

Aryan Khan : आर्यनने जे काही केलं ते पाहून चाहते निराश झालेत. अनेकांनी यावरून आर्यनला ट्रोल करायला सुरूवात केली. आर्यनने असं काय केलं...?

अनुराग कश्यपचा ‘ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत’ हा नवा सिनेमा येतोय. नुकतंच या चित्रपटाचं स्पेशल स्किनिंग पार पडलं. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या स्क्रिनिंगला हजर होते. शाहरूख खानचा लाडला आर्यन खान (Shah Rukh Kahn son Aryan Khan) यानेही या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. पण यावेळी आर्यनने जे काही केलं ते पाहून चाहते निराश झालेत. अनेकांनी यावरून आर्यनला ट्रोल करायला सुरूवात केली. आर्यनने असं काय केलं तर पापाराझींना इग्नोर केलं. होय, त्याची हीच गोष्ट अनेकांना खटकली. मग काय, नेटकरी त्याच्यावर भडकले.

‘ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जावेद अख्तर, हुमा कुरेशी, राधिका आपटे, शबाना आझमी, यांसारखे अनेक दिग्गज कलाकार  उपस्थित होते. या सर्व दिग्गज मंडळींनी मीडिया फोटोग्राफर्सना आनंदाने पोज दिल्या. पण आर्यन खान गाडीतून उतरला अन् पापाराझींकडे दुर्लक्ष करत थेट आत गेला.   

त्याच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संतप्त कमेंट्स केल्या आहेत. 'लड़का बड़ा हो गया है, फुल एटिट्यूड,' असं एका युजरने म्हटलं. 'अरे, कशाला इतका ॲटिट्युड दाखवतोस, जरा वडिलांकडून शिक,' असा सल्ला काही युजर्सनी आर्यनला दिला. 'फक्त वडिलांमुळे तुला इतकी प्रतिष्ठा अन् लोकप्रियता मिळाली आहे, त्याचा आदर कर', असंही काही जणांनी त्याला सुनावलं. काहींनी मात्र आर्यनचा फुल्ल सपोर्ट  केला. 'अरे त्याच्या मागे का पडलेत सगळे, त्याच्या फोटोंची काय गरज,' असं लिहित एका युजरने आर्यनचा बचाव केला.

आर्यन खान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. बॉलिवूडमध्ये अद्यापही त्याची एन्ट्री झालेली नाही. पण किंगखानचा मुलगा म्हटल्यावर तो जिथे जाईल तिथे कॅमेरे त्याचा पाठलाग करताना दिसतात. आर्यनच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी त्याचे आणि शाहरुख खानचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. मात्र आर्यन अनेकदा फोटोग्राफर्सकडे दुर्लक्ष करतो, त्यांना पोझ देणं टाळतो. याआधीही अशाच कारणानं तो ट्रोल झाला होता.

टॅग्स :आर्यन खानशाहरुख खानबॉलिवूड