Join us  

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याचा बदललेला लूक पाहून हैराण झाले चाहते, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 1:39 PM

आराध्या बच्चनचा (Aaradhya Bachchan) एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिची आई ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan)सोबत दिसत आहे.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan)जगभरात लोकप्रिय आहे, पण तिची मुलगी आराध्या बच्चन(Aradhya Bachchan)ची लोकप्रियता काही कमी नाही. आराध्या बच्चनशी संबंधित कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होते. याच क्रमात आराध्या बच्चनचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिची आई ऐश्वर्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ Voompl च्या अधिकृत इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)ही दिसत आहे. व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या, आराध्या आणि तिची मैत्रीण, कोरिओग्राफर मर्जी दिसत आहे. सुरुवातीला अभिषेक त्यांच्या गाडीच्या येण्याची वाट पाहत असल्याचे दिसते. त्याचवेळी ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत कारमध्ये बसलेली दिसत आहे. ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असते, मात्र यादरम्यान आराध्या बच्चनचा बदललेला लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आराध्या ऐश्वर्याच्या खांद्यापर्यंत दिसत आहे, ज्याला पाहिल्यानंतर काही यूजर्स आराध्या किती मोठी झाली असे म्हणताना दिसत आहेत.

नुकतेच बच्चन कुटुंब त्यांच्या मित्रांच्या घरी डिनरसाठी पोहोचले होते, तिथला हा व्हिडिओ समोर आला आहे. अलीकडेच आराध्या बच्चनचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता, ज्यामध्ये ती हिंदीमध्ये कविता वाचताना दिसत होती. या व्हिडीओची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसत आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन