Join us  

अल्लू अर्जूनच्या फॅन्सने इव्हेंटमध्ये केली तोडफोड, पोस्ट शेअर करून दिलं त्याने स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 1:47 PM

Allu Arjun : वेळेवर गर्दी खूप जास्त वाढली आणि इव्हेंट कॅन्सल करण्यात आला. ज्यानंतर फॅन्सने तिथे तोडफोड सुरू केली. नंतर पोलिसांनी स्थिती सांभाळली.

'टॉलिवूडमधील सुपरस्टार अल्लू अर्जूनचा (Allu Arjun) एक फॅन इव्हेंट नुकताच रद्द करण्यात आला. सोमवारी अल्लू अर्जून त्याच्या फॅन्सना भेटणार होता आणि त्याच्या फॅन्ससोबत फोटो काढणार होता. अशात इथे इव्हेंटमध्ये २०० लोक राहतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. पण वेळेवर गर्दी खूप जास्त वाढली आणि इव्हेंट कॅन्सल करण्यात आला. ज्यानंतर फॅन्सने तिथे तोडफोड सुरू केली. नंतर पोलिसांनी स्थिती सांभाळली.

अल्लू अर्जुनला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. अल्लूने लिहिलं की, 'मला घटनेबाबत समजलं आणि अशीही माहिती मिळाली की, आजच्या इव्हेंटमध्ये काही फॅन्स जखमी झाले. घटनेकडे माझी टीम पर्सनली लक्ष देत आहे आणि मला अपडेट करत आहेत. मी लक्ष ठेवेन की, भविष्यात असं काही होणार नाही. माझ्यासाठी तुमचं प्रेम जास्त किंमती आहे आणि मी याला कधीही ग्रांटेड धरणार नाही'.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अल्लू एका वेगळ्या कारणाने चर्चेत होता. त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पूर्ण टीमला सोन्याची अंगठी गिफ्ट केली होती. साऊथचा सुपरस्टार अल्लूचा आगामी सिनेमा 'पुष्पा' (Pushpa) च्या ट्रेलरने रिलीज होताच धमाका केला होता. फॅन्स आता या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत.  

 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodसोशल मीडिया