बॉलिवूड क्वीन मलायका अरोराची (Malaika Arora)ओटीटी जगात धमाकेदार एन्ट्री झाली. मलायकाचा ‘मूव्हिंग इन विद मलायका’ (Moving In With Malaika) हा चॅट शो सुरू झाला आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाची बेस्ट फ्रेन्ड व कोरिओग्राफर फराह खान दिसली. फराहशी बोलताना मलायकाने आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत. अगदी मलायका रडतानाही दिसली.
‘मूव्हिंग इन विद मलायका’च्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायका तिचे नातेसंबंध, लव्ह लाईफ, ट्रोलिंग अशा सगळ्यांबद्दल बोलली. शोच्या येणाऱ्या एपिसोडमधूनही मलायकाच्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांना आणखी बरंच काही कळणार आहे. पण तूर्तास पहिल्या एपिसोडनंतरचा चाहत्यांनी फिडबॅक दिला आहे आणि हा फिडबॅक कदाचित मलायकाची निराशा करणारा आहे. होय, ‘मूव्हिंग इन विद मलायका’चा पहिला एपिसोड स्ट्रिम होताच, सोशल मीडियावर या शोची खिल्ली उडवली जात आहे. मीम्सचा पूर आला आहे. अनेकांनी हा शो पीआर बेस्ड असल्याचं म्हणत मलायकाची खिल्ली उडवली आहे.
व्हायरल मीम्सही स्क्रिप्ट कुणी लिहिली? अशा शब्दांत एका युजरने मलायकाच्या शोची खिल्ली उडवली आहे.
सगळं काही नकली, किती कपोलकल्पित शो आहे, अशा शब्दांत एका युजरने या शोबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
हर अॅक्सिडंटने मुझे कुछ ना कुछ सिखाया...
मेरी जान आपके हात में है...
फिरसे जीना शुरू करूंगी...
सोशल मीडियावरच्या या प्रतिक्रिया बघता, मलायकाचा शो फॅन्सला फार काही आवडला नाही, असंच दिसतंय. सध्या फक्त एक एपिसोड लोकांनी पाहिला आहे. आता पुढे या शोबद्दल चाहते काय बोलतात, ते बघूच.