Join us  

​फराह खान म्हणते, लोकांसाठी हिंदी चित्रपट म्हणजे ‘घर की मुर्गी...’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 3:25 PM

बॉलिवूड चित्रपट निर्माती व कोरिओग्राफर फराह खान हिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. फराह ...

बॉलिवूड चित्रपट निर्माती व कोरिओग्राफर फराह खान हिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. फराह म्हणाली, ज्या लोक हिंदी चित्रपटांचा विरोध करतात त्यांना बोरिंग चित्रपट पाहण्याची शिक्षा दिली पाहिजे. भारतातील काही लोकांसाठी हिंदी चित्रपट म्हणजे ‘घर की मुर्गी दाल बराबर’ असे आहेत. ‘मैं हू ना’, ‘ओम शांती ओम’, ‘तीस मार खां’ व ‘हॅप्पी न्यू इअर’ सारखे सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणाºया फराह खान हिची ओळख बॉलिवूडमधील आघाडीच्या कोरिओग्राफरमध्येही केली जाते. फराह खान हिने संजय लीला भन्साळी यांच्यावर राजस्थानात झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. फराह म्हणाली, सामान्यत: लोक हिंदी चित्रपटांना मसाला, आयटम नंबर या सारखी नावे देतात. मात्र हे चित्रपटात कायम दिसणाºया गोष्टी आहेत. अशा लोकांनी फ्रेंच किंवा पोलिश चित्रपट पाहिले पाहिजे. त्यांना जीवनभर बोरिंग चित्रपट पाहण्याची शिक्षा द्यायला हवी. Read More : आता येणार ‘ओम शांती ओम’चा जपानी रिमेक!फराह म्हणाली, परदेशात बॉलिवूड गाणी व डान्स पसंत केला जात आहे, जेव्हा मी परदेशात असते तेव्हा तेथील लोकांना बॉलिवूड चित्रपट किती आवडतात हे पाहून आश्चर्य वाटते, त्यांना आपली गाणी व डान्स पसंत आहे. जे लोक बॉलिवूडच्या चित्रपटातील दोष शोधतात त्यांनी विदेशात जाऊन थोडा तेथील लोकांची मते जानून घेतली पाहिजे. आमच्या काही लोकांना बॉलिवूड चित्रपट ‘घर की मुर्गी’ सारखे वाटू लागले आहेत. Read More : ‘या’ दोघांशिवाय हृतिक रोशन डान्सर बनूच शकला नसता!सध्या फराह खान ‘झलक दिखला जा ९’ व ‘इंडियन आयडल ९’ या रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. नुकतीच फराह खान ‘इंडियन आयडल’च्या सेटवर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली काळ्या रंगाची साडी घालून दिसली होती. असे सांगण्यात येते की फराहने पहिल्यांदाच टीव्ही कार्यक्रमात साडी घातली आहे. ALSO READ अन्नू मलिक सांगतोय, इंडियन आयडलमध्ये काहीही स्क्रिप्टेड नसते​स्वप्निल जोशी थिरकला माधुरी दिक्षितच्या या गाण्यावर