'मैं हूँ ना'मध्ये फराह खानला नको होता मुस्लिम व्हिलन; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 04:00 PM2021-11-18T16:00:00+5:302021-11-18T16:00:00+5:30

Farah Khan: देशातील हिंदू-मुस्लिम वाद कोणासाठीही नवीन नाही. यात अनेकदा चित्रपटांमधील कलाकारांच्या जाती-धर्मावरुन किंवा त्यांच्या भूमिकांवरुनही ट्रोलिंग सुरु होतं.

Farah Khan says she ensured Main Hoon Na villain was not a Muslim | 'मैं हूँ ना'मध्ये फराह खानला नको होता मुस्लिम व्हिलन; कारण...

'मैं हूँ ना'मध्ये फराह खानला नको होता मुस्लिम व्हिलन; कारण...

googlenewsNext

प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) यांचा २००४ साली प्रदर्शित झालेला 'मैं हूँ ना' (Main Hoon Na) हा चित्रपट आजही सगळ्यांना आठवत असेल. शाहरुख खान (shahrukh khan), सुष्मिता सेन (sushmita sen) आणि सुनील शेट्टी (suniel shetty) अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट त्या काळी तुफान गाजला होता. आजही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीने खलनायकाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्याची ही भूमिकादेखील चांगलीच चर्चेत राहिली होती. परंतु, या भूमिकेबाबत फराहने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता.  खलनायकाच्या भूमिकेत एका मुस्लीम अभिनेत्याची निवड करायची नव्हती, असं त्यांनी सांगितलं होतं. याविषयी 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

देशातील हिंदू-मुस्लिम वाद कोणासाठीही नवीन नाही. यात अनेकदा चित्रपटांमधील कलाकारांच्या जाती-धर्मावरुन किंवा त्यांच्या भूमिकांवरुनही ट्रोलिंग सुरु होतं. असाच वाद सध्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत असला तरीदेखील त्यातील काही सीनवरुन तो हिंदू-मुस्लिम वादात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या फराह खानची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीत तिने 'मैं हूँ ना' मध्ये मुस्लीम खलनायक दाखवायचा नव्हता असं म्हटलं होतं. 

 

'मैं हूँ ना'च्या माध्यमातून फराहने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या पॉडकास्टच्या वेळी त्यांनी चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेविषयी खुलासा केला होता. ''मैं हूँ ना'मध्ये एखादा मुस्लिम अभिनेता खलनायकाच्या रुपात झळकावा अशी माझी इच्छा नव्हती'', असं फराह यावेळी म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. मात्र, यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

'मैं हूँ ना'मध्ये अभिनेता सुनील शेट्टीने खलनायकाची भूमिका साकारली होती. यात तो राघवन नावाच्या दहशतवाद्याच्या रुपात झळकला होता. परंतु, सुनील शेट्टीच्या राइड हँण्डचं नाव मात्र तिने खान असं ठेवलं होतं. ज्याला नंतर कळते की त्याला फसवले गेलं आहे आणि नंतर तो शेवटी

दहशतवादापासून दूर जातो आणि देशभक्त बनतो. दरम्यान, मैं हूँ ना या चित्रपटात शाहरुख खान, झायेद खान, सुनील शेट्टी, सुष्मिता सेन आणि अमृता राव हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. 
 

Web Title: Farah Khan says she ensured Main Hoon Na villain was not a Muslim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.