Join us

फराह खानने लुटला रस्त्यावर शॉपिंग करण्याचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:06 IST

सध्या फराह तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ती अलीकडेच स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली. 

बॉलीवूडमध्ये फराह खानने कोरिओग्राफर, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे. फराह खान ही चित्रपटांपेक्षा तिच्या साधेपणामुळे जास्त चर्चेत असते. सध्या फराह तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. फराह अलीकडेच स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली. 

दिग्दर्शक पुनीतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये फराह तिच्या बीएमडब्ल्यू सीरीज 7 मध्ये बसून स्ट्रीट शॉपिंग करताना पाहायला मिळत आहे. तिचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सोबतच यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येत आहेत.

व्हिडीओत दिसते की, फराह रस्त्याच्या कडेला वस्तू विकणाऱ्या एका व्यक्तीला बोलावून ट्रायपॉडची किंमत विचारते. विक्रेत्याने 390 रुपये असल्याचे सांगितल्यावर ती खूप महाग आहे असे म्हणत 500 रुपयांची नोट त्याला देते. आणि 110 रुपये परत मागते. खरं तर ती ज्या कारमध्ये बसून शॉपिंग करत आहे, त्या कारची किंमतच कोटीमध्ये आहे.  फराह यापूर्वी अनेकदा स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली आहे

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, फराह खानने 'हॅपी न्यू इयर', 'ओम शांती ओम' आणि 'तीस मार खान' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.  फराह खान दीर्घ काळापासून तिच्या नृत्यदिग्दर्शनासाठी ओळखली जाते आणि तिने 100 हून अधिक गाण्यांमध्ये तिचे नृत्यदिग्दर्शन कौशल्य दाखवले आहे.  ती मोठ्या पडद्यावर आणि टीव्हीवर सक्रिय राहते.  वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने शिरीष कुंदरशी लग्न केले असून तिला तीन मुले आहेत.

टॅग्स :फराह खानबॉलिवूड