Join us

जबाबदार कोण? नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान अख्तर व परिणीती चोप्राचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 2:09 PM

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत अनेक मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशातील एका नदीत मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत.

ठळक मुद्देनदीत अशाप्रकारे मृतदेह वाहून येत असल्याने एकीकडे नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय कोरोनाचा धोकाही वाढला आहे.

गंगा आणि अन्य नद्यांत तरंगणारे मृतदेह पाहून कुठल्याही संवेदनशील मनात कालवाकालव होईल. अभिनेते अनुपम खेर यांनी या मुद्यांवर सरकारला जाब विचारला. आता अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा  (parineeti chopra) यांनीही नद्यांमधील या तरंगत्या मृतदेहांवर संताप व्यक्त केला आहे. यामुळे नद्यांचे जे नुकसान होईल, त्याला जबाबदार कोण? असा खरपूस सवाल त्यांनी विचारला आहे. (Dead Bodies Found Floating In Ken River)बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य राज्यांच्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह तरंगताना आढळून आलेत. बिहार सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गंगेत 71 मृतदेह आढळलेत, मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील नदीतही अनेक मृतदेह तरंगताना आढळून आलेत. नदीत अशाप्रकारे मृतदेह वाहून येत असल्याने एकीकडे नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय कोरोनाचा धोकाही वाढला आहे. हे मृतदेह कोरोना रूग्णांची असण्याचीही शक्यताही व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर फरहान आणि परिणीती यांनी ट्विट केले आहे.

फरहान म्हणाला, हे भयंकर...

‘नदीत तरंगणारे आणि काठांवर वाहून येणारे मृतदेहांचा आकडा भयंकर आणि मन हेलावणारा आहे. एक ना एक दिवस व्हायरसचा खात्मा होईलच. पण यंत्रणांना या अपयशाची जबाबदारी घ्यावीच लागेल,’ असे ट्विट फरहानने केले आहे.

तुमच्या आईचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला तर?

परिणीती चोप्राने ट्विटमध्ये लिहिले, ‘नदीत तरंगणारे ते मृतदेह कुणाच्या आईचे, कुणाच्या लेकीचे, कुणाच्या पित्याचे, कुणाच्या मुलाचे होते. तुम्ही त्या नदीकाठी उभे आहात आणि तुमच्या आईचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला तर तुमची काय अवस्था होईल? UNTHINKABLE. Monsters...’

टॅग्स :फरहान अख्तरपरिणीती चोप्रा