Join us

फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:14 AM

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. फराहन आणि शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देसध्या दोघे मेक्सिकोमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेतगेल्यावर्षीच्या फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. सार्वजनिक ठिकाणी नेहमीच ते एकत्र स्पॉट केले जातात, सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो टाकत असतात तरीही त्यांनी आपलं नातं अधिकृत्यरित्या अजून स्वीकारले नाही.  

फराहन आणि शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे. दोघांनी या फोटोला कॅप्शनदेखील सारखे दिले आहे मात्र इमोजी वेगवेगळ्या आहेत. या पोस्टवरुन एक गोष्ट स्पष्ट होते की दोघांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि सध्या दोघे मेक्सिकोमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.  

गेल्यावर्षीच्या फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेच जाहिर केले होते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार एप्रिलमध्ये ते लग्नच्याबेडीत अडकणार असल्याचे समजतेय. 

कामाबाबत बोलायचे झाले तर फरहान ‘द स्काज इज पिंक’ या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर