Join us

Farhan Akhtar : फरहान अख्तरने पोस्ट शेअर करत मागितली चाहत्यांची माफी, काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 11:24 AM

Farhan Akhtar : होय, फरहानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, दिलगिरी व्यक्त केली आहे.

अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) एक गायकही आहे. अनेक चित्रपटांची गाणी त्याने गायली आहेत. त्याचा एक बँडही आहे. जगभर त्याचे कॉन्सर्ट होत असतात. पण आता ऑस्ट्रेलियातील त्याचा कॉन्सर्ट रद्द झाला आहे. काल फरहानने जड अंत:करणाने ऑस्ट्रेलियातील कॉन्सर्ट रद्द झाल्याची माहिती दिली. ऐनवेळी कॉन्सर्ट रद्द झाल्याने चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. 

मागितली माफी

काल फरहानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. “माझ्या ऑस्ट्रेलियातील चाहत्यांनो, काही कारणांस्तव आमचा बँड फरहान लाइव्हला ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागत आहे. या आठवड्याच्या शेवटी आम्ही सिडनी आणि मेलबर्नला येऊ शकणार नाही. याबद्दल मी माझी निराशा तुमच्याशी शेअर करतोय. आम्ही आशा करतो की भविष्यात कधीतरी तुमच्या शहरात येऊ. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम,”असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं.

फरहानने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्यात. अनेकांनी कॉन्सर्ट रद्द झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. “आम्ही तुला भेटण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो,” असं एका चाहत्याने लिहिलं.  “शो का रद्द केला? आमच्या आनंदावर पाणी फिरलं,” असं अन्य एकाने लिहिलं.  “शो रद्द झाला तर आता आम्हाला आमचे पैसे परत मिळतील का?”, असा सवाल एका चाहत्याने केला.

फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो एक सिनेमा घेऊन येतोय. या चित्रपटाद्वारे फरहान पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावतो आहे. कतरिना कैफ, आलिया भट व प्रियंका चोप्रासोबत 'जी ले जरा' हा सिनेमा तो बनवतो आहे. अद्याप शूटींग सुरू झालेलं नाही. पण गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे.

टॅग्स :फरहान अख्तरबॉलिवूड