Join us

Farhan Akhtar: महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर..राजेशाही थाटात जगतो फरहान अख्तर, जाणून घ्या त्याची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 3:45 PM

फरहान अख्तरने मुंबईतील वांद्रेमध्ये एक आलिशान बंगला बांधला आहे. यासह त्याला लक्झरी कारचीदेखील आवड आहे

फरहान अख्तर ही एक बॉलिवूड व्यक्तिमत्व आहे ज्याने मनोरंजन विश्वाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. फरहान अख्तरने अभिनय, गायन, दिग्दर्शन, पटकथा लेखन या सर्वच क्षेत्रात हात आजमावला आणि त्याला यश मिळाले. फरहान अख्तर असा अभिनेता आहे ज्याला सिनेमाची उत्तम जाण आहे. फरहानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. फरहानने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान मिळवलं आहे. मेहनतीच्या जोरावर त्यानं कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. फरहानला आलिशान लाईफस्टाईल जगणे आवडते. आज फरहान अख्तर त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याचं नेटवर्थबाबत. 

फराहनची संपत्तीफरहान अख्तर हा जावेद अख्तर  (Javed Akhtar) यांचा मुलगा आहे. फरहानचा इंडस्ट्रीशी जुना संबंध आहे. स्टार किड असूनही फरहानने आपल्या मेहनतीने आपली छाप पाडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर(Farhan Akhtar Net Worth) 148 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. फरहान अख्तरने मुंबईतील वांद्रेमध्ये एक आलिशान बंगला बांधला आहे. फरहानने परदेशातही मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. आहे.फरहान (Farhan Film Fees)  एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटींचं मानधन घेतो. फरहान जाहिरातींसाठीही मोठी रक्कम घेतो.

फरहान अख्तरला लक्झरी कारची आवड आहे. फरहानची सर्वात महागडी कार Porsche Cayman आहे, ज्याची किंमत 1.07 कोटी रुपये आहे. यासोबतच अभिनेत्याकडे ५४ लाखांची रेंज रोव्हर, मर्सिडीज वेंज आणि होंडा सीआरव्ही आहे. फरहान अख्तरला आलिशान जगणं आवडते. तो अनेकदा परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी जातो. 

टॅग्स :फरहान अख्तरसेलिब्रिटी