बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणजे फरहान अख्तर. सुरुवातीला दिग्दर्शक म्हणून ओळख कमावलेला फरहान आज अभिनेता आणि निर्माता या दोन्ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत आहे. फरहानने करिअरच्या सुरुवातीलाच 'दिल चाहता है', 'लक्ष्य', 'डॉन' अशा विविध विषयांवरील सिनेमांचं दिग्दर्शन केलं. पण यापैकी एक सिनेमा सपशेल फ्लॉप झाल्याने फरहानला डिप्रेशनचा शिकार व्हावं लागलं होतं.
म्हणून फरहान गेलेला डिप्रेशनमध्ये
फरहान अख्तरने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला. लहानपणापासून मेहनत करा फळ नक्की मिळेल, हे फरहान ऐकत आला होता. फरहानने एका सिनेमासाठी अशीच जीव तोडून मेहनत केली. या सिनेमाचं नाव 'लक्ष्य'. हृतिक रोशन या सिनेमात प्रमुख भूमिकेत होता. भारतीय जवानांच्या पराक्रमावर 'लक्ष्य' सिनेमा आधारीत होता. हृतिकसोबतच अमिताभ बच्चन, प्रिती झिंटा, ओम पुरी असे एकापेक्षा एक कलाकार सिनेमात होते. परंतु तरीही काही गोष्टी जुळून नाही आल्या आणि 'लक्ष्य' फ्लॉप झाला.
डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी फरहानला मित्रांकडून मदत
हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या 'लक्ष्य' सिनेमाचं दिग्दर्शन फरहानने केलं होतं. परंतु सिनेमा फ्लॉप झाल्याने फरहान मनोमन उदास झाला. त्याच्या आयुष्यात जणू निराशेची पोकळी निर्माण झाली. हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर पुढे तब्बल दीड वर्ष फरहान डिप्रेशनमध्ये होता. त्यावेळी आता आहेत तसे थेरपी वगैरे प्रकार नव्हते. त्यामुळे या काळात फरहानच्या मित्रांनी त्याला आधार दिला. त्याने मित्रांसोबत डेहराडूनचा प्रवास गेला. याशिवाय भारतीय सैन्याच्या अकादमीला भेट दिली. फरहान सध्या रणवीर सिंगसोबत 'डॉन' सिनेमाची तयारी करतोय.