बॉलिवूडमध्ये असे अनेकवेळा झाले आहे सुरुवातीला एखादा सिनेमा वेगळ्याच अभिनेता किंवा अभिनेत्रीला ऑफर केला जातो आणि नंतर तो हिट झाल्याने आपण का नाकारला याची त्याची सल त्यांना आयुष्यभर राहते.
अभिनेता, दिग्दर्शक आणि सिंगर फरहान अख्तरसोबत सुद्धा असेच काहीसे घडले होते. फरहानने एक सुपरहिट सिनेमा सोडला होता आणि त्याचे दु:ख त्याला आजही आहे. हा सिनेमा होता राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला 'रंग दे बसंती'. राकेश ओमप्रकाश मेहरा यासिनेमाबाबत बोलताना म्हणाले होते की, मला नेहमीच फरहानच अभिनय आवडला आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, मी 'रंग दे बसंती'ची ऑफर त्याला दिली होती. तो एकदम हैराण झाला होता कारण त्यांने याआधी कधीच कॅमेरा फेस नव्हता केला. त्यावेळी त्यांने 'दिल चाहता है' दिग्दर्शित केला होता आणि 'लक्ष्य'चे दिग्दर्शन करत होता. फरहानने हा सिनेमा नाकारण्या मागचे कारण देखील सांगितले होते की, ''त्यावेळी मला अभिनय करायचा नव्हता मात्र आता मला या गोष्टीची खंत आहे की मी तो सिनेमा का नाकारला.'' त्यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या भाग मिल्खा भागमध्ये फराहन दिसला होता आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट देखील झाला होता. फराहन अख्तरने 'रॉक ऑन' सिनेमातून अभिनयात पदार्पण केले.
प्रोफेशन लाईफसोबतच फरहानची पर्सनल लाईफदेखील तेवढीच चर्चेत राहिली. फरहानने मागील वर्षी अधुनासोबत घटस्फोट घेतला. फराहन आणि अधुना यांच्या घटस्फोटामागचे कारण फरहान आणि श्रद्धा कपूर यांच्यामधील वाढती जवळीक मानली जाते. फरहान आणि श्रद्धाने पहिल्यांदा ‘रॉक आॅन-२’ मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांमधील अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही समोर आले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून दोघे एकमेकांना टाळत असल्याचे कळतेय.