Join us

फरहान अख्तरने दिली 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची हिंट, शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:06 IST

हृतिक, अभय देओल अन् फरहान अख्तरने शेअर केला व्हिडिओ

तीन मित्रांची युरोप ट्रीप म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो 'जिंदगी मिलेगी ना दोबारा' (Zindagi Na Milegi Dobara)  सिनेमा. २०११ साली आलेल्या या सिनेमात फरहान अख्तर (Farhan Akhtar), हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभय देओल (Abhay Deol) यांची मुख्य भूमिका होती. तरुणाईचा हा ऑल टाईम फेवरिट सिनेमा. दरम्यान याचा सीक्वेल कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यातच नुकतंच फरहान अख्तरने व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो हृतिक आणि अभयसोबत दिसत आहे ज्यातून 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलचीच हिंट मिळत आहे.

व्हिडिओमध्ये फरहान अख्तर, हतिक रोशन आणि अभय देओल तिघेही एकाच ठिकाणी पाहत आहेत. हृतिक सिनेमातील त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो, Unelievable! आणि फरहान म्हणतो, Outstanding! हे तिघंही समोर असलेल्या फ्रेमकडे पाहत असतात ज्यावर 'The Three Musketeers असं लिहिलं आहे. फरहानने व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सिनेमाचं सेनोरिटा गाण्याचं म्युझिक लावलं आहे. 

या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत सीक्वेलची अपेक्षा केली आहे.'प्लीज सीक्वेल आणा', 'तुम्ही या साईन्स बघत आहात का', 'तुम्हाला परत बघायचं आहे' अशा कमेंट्स आल्या आहेत. चाहतेही या रियुनियनसाठी वाट पाहत आहेत. 

फरहान अख्तर 'जी ले जरा' हा सिनेमाही घेऊन येणार आहे. यामध्ये कतरिना कैफ, प्रियंका चोप्रा आणि आलिया भट या तीन अभिनेत्रींना एकत्र आणणार आहे. काही वर्षांपूर्वीच सिनेमाची घोषणा झाली होती. मात्र अद्याप सिनेमाचं शूट सुरु झालेलं नाही. चाहते याही सिनेमासाठी आतुर आहेत. 

टॅग्स :फरहान अख्तरहृतिक रोशनअभय देओलबॉलिवूडसोशल मीडिया