Farhan Akhtar Net Worth: बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 9 जानेवारी 2022 रोजी त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहान अख्तर(Farhan Akhtar) ने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच फरहान अख्तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शनही करतो. फरहान अख्तरने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. फरहान अख्तर(Farhan Akhtar Net Worth)ने मेहनतीच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. फरहानला आलिशान लाईफस्टाईल जगणे आवडते.
फरहान अख्तर हा जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा मुलगा आहे. फरहानचा इंडस्ट्रीशी जुना संबंध आहे. स्टार किड असूनही फरहानने आपल्या मेहनतीने आपली छाप पाडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर(Farhan Akhtar Net Worth) 148 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. फरहान (Farhan Film Fees) एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटींचं मानधन घेतो. अभिनेत्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 22 कोटी रुपये आहे. फरहान जाहिरातींसाठीही मोठी रक्कम घेतो.