गेल्या तीन महिन्यांपासून फरहान अख्तरबद्दल चर्चा रंगतेय. होय, फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकर ही नवी महिला आल्याचे आता जगजाहिर झाले आहे. गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चर्चेला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता. यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेचं जाहिर केले होते.
‘ये पब्लिक है, सब जानती है,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. एका युजरने ‘आग लगा दे, बेबी फायर. तू है झूठा, लायर...’, असे लिहित फरहानची मजा घेतली.
एका युजरने तर ‘अॅण्ड वुई बोर्न आॅन अर्थ टुडे’, असे लिहित फरहानला छेडले.एकंदर काय तर फरहान व शिबानीचा रोमान्स सध्या जोरात आहे. दोघेही ‘इशारों इशारों में’ बरेच काही सांगत असले तरी ‘ये पब्लिक है, सब जानती है’ हेच खरे...
२०१५ पासून फरहान व शिबानी एकमेकांना ओळखतात. फरहान जो शो होस्ट करत होता. शिबानीही त्या शोचा भाग होती. पुढे त्यांची मैत्री झाली आणि आताश: हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय. आता दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही.फरहान हा घटस्फोटित आहे. दोन मुलांचा बाप आहे. तूर्तास ‘द स्काज इज पिंक’च्या शूटींगमध्ये तो बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरूवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती.