Join us

इश्क की असली कहानी...! ‘स्पेशल रूम’मध्ये सुरु झाली प्रियंका-निकची लव्हस्टोरी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 2:02 PM

प्रियंका चोप्रा व निक जोनासची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. आधी हे कपल लग्नामुळे चर्चेत आले आणि आता या दोघांच्या रोमान्सची चर्चा होतेय.

ठळक मुद्दे‘स्काय इज पिंक’ चित्रपटात मुलीचा आजार आणि माता-पित्याचा संघर्ष दाखवला जाणार आहे.

प्रियंका चोप्रानिक जोनासची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. आधी हे कपल लग्नामुळे चर्चेत आले आणि आता या दोघांच्या रोमान्सची चर्चा होतेय. प्रियंका व निकच्या लग्नाबद्दलच्या अनेक बातम्या आल्यात. प्रियंकाने लग्नासाठी सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा सोडला, असेही म्हटले गेले. पण ‘भारत’ सोडल्यानंतर दोनच दिवसांनी तिने सोनाली बोस दिग्दर्शित ‘स्काय इज पिंक’ची घोषणा केली होती. ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यानिमित्ताने प्रियंका व निकची खरी लव्हस्टोरी समोर आली आहे. होय, ‘न्यूज 18 हिंदी’सोबत बोलताना खुद्द प्रियंकाने या लव्हस्टोरीची सुरूवात कशी झाली, हे सांगितले.

ऐकून आश्चर्य वाटेल पण, ‘स्काय इज पिंक’ साईन केला तोपर्यंत प्रियंकाचा निकसोबत लग्नाचा कुठलाही इरादा नव्हता. प्रियंका याबद्दल सांगते, ‘स्काय इज पिंक’संदर्भात मी दिग्दर्शिका सोनाली बोस हिला भेटायला आले, तोपर्यंत निकसोबत लग्नाचा विचारही मी केला नव्हता. निक आणि मी केवळ मित्र होतो. एवढेच काय, तोपर्यंत आम्ही डेटींगलाही सुरुवात केली नव्हती. ‘स्काय इज पिंक’च्या दरम्यान आमची लव्हस्टोरी सुरु झाली. ‘स्काय इज पिंक’चे अर्धे शूटींग संपले होते, तेव्हा मी लग्नाचा निर्णय घेतला. त्याआधी निक पिक्चरमध्ये कुठेही नव्हता...

सीक्रेट रूममध्ये बहरली लव्हस्टोरी या मुलाखतीत फरहान अख्तरनेही खुलासा केला. ‘स्काय इज पिंक’च्या सेटवर एक स्पेशल रूम होती. खरे तर प्रियंकासाठी खास ही रूम बनवण्यात आली होती. या खोलीत प्रियंका निकसोबत फोनवर बोलायची. लग्नाची तयारीसंदर्भातील सगळे कॉल्स याच खोलीत झालेत. निक अनेकदा सेटवर प्रियंकाला भेटायला यायचा, असेही त्याने सांगितले.

‘स्काय इज पिंक’ चित्रपटात मुलीचा आजार आणि माता-पित्याचा संघर्ष दाखवला जाणार आहे. प्रियंकासोबत चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट मोटिवेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. सहा महिन्यांच्या वयात बोन मॅरो ट्रांसप्लांटचा सामना करणा-या आयेशाला काही काळानंतर साइड-इफेक्टमुळे पल्मोनरी फायबरोसिस सारखा घातक आजार झाला होता. केवळ 19 वर्षांच्या वयात तिचा मृत्यु झाला होता.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास