डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 09:00 AM2019-04-13T09:00:00+5:302019-04-13T17:55:17+5:30

शाहरुखने काही वैयक्तिक कारणांमुळे डॉन 3 सोडून दिला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या.

Farhan Akhtar on rumours of Ranveer Singh replacing Shah Rukh Khan in 'Don 3' | डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा

डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देफरहानने डॉन 3 बद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाबाबत काही सांगायचे असेल तर मी स्वतः येऊन मीडियाशी बोलेन. सध्या तरी लोकांना काहीही सांगण्यासारखे अथवा त्यांच्यापासून लपवण्यासारखे काहीही नाहीये. 

अमिताभ बच्चन यांचा डॉन हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अमिताभ डबल रोलमध्ये दिसले होते. त्यांच्या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाचे अनेक फॅन आहेत. याच चित्रपटावर आधारित डॉन हा चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचा आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

शाहरुखने काही वैयक्तिक कारणांमुळे डॉन 3 सोडून दिला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. शाहरुखने हा चित्रपट करण्यास मनाई केल्याने झोया अख्तर चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात असल्याचे देखील म्हटले जात होते. झोया अख्तर या सिनेमासाठी रणवीर सिंगच्या नावाचा विचार करतेय. तसेच दोघांमध्ये या संदर्भात बोलणं देखील सुरू असल्याची चर्चा रंगली होती. रणवीर सिंगने झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली दोनदा काम केले आहे तर झोया अभिनेत्रीच्या नावासाठी कॅटरिना कैफचा विचार करतेय असे देखील म्हटले जात होते. कॅटने झोयासोबत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये काम केले आहे.    

शाहरुख डॉन 3 मध्ये नसणार या बातम्या मीडियात येत असल्या तरी डॉनचा दिग्दर्शन फरहान अख्तरने याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता फरहानने डॉन 3 बद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाबाबत काही सांगायचे असेल तर मी स्वतः येऊन मीडियाशी बोलेन. सध्या तरी लोकांना काहीही सांगण्यासारखे अथवा त्यांच्यापासून लपवण्यासारखे काहीही नाहीये. 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला त्यानंतर शाहरुख आपल्या सिनेमांना घेऊन खूपच सिलेक्टिव्ह झाला आहे. राकेश शर्मांच्या बायोपिकमधून त्यांने हात काढून घेतला. त्यामुळेच डॉन 3 बाबत मीडियात चर्चा रंगली होती.

2006 मध्ये डॉनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात शाहरुख आणि प्रियांका चोप्राची जोडी जमली होती. तर करिनाचा कॅमिओ होता. त्यानंतर 2011 मध्ये आलेल्या डॉन 2 मध्ये पुन्हा प्रियांका-शाहरुख दिसले होते. 

Web Title: Farhan Akhtar on rumours of Ranveer Singh replacing Shah Rukh Khan in 'Don 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.