पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर फरहान अख्तर व श्रद्धा कपूर यांची जवळीक नको इतकी वाढली होती. श्रद्धा तर फरहानसोबत लिव्ह-इनमध्ये राहायलाही तयार होती. अर्थात वडील शक्ती कपूर यांनी विरोध केला आणि श्रद्धाचा हा प्लान फसला. पुढे फरहानसोबतचे श्रद्धाचे नातेही फसले. दोघांचेही ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर श्रद्धा ज्याला त्याला ती सिंगल असल्याचे सांगत आहे. (प्रत्यक्षात श्रद्धाचे नाव एका सुप्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत जोडले जात आहे.) पण फरहानच्या आयुष्यात मात्र एका नव्या ‘लव्ह लेडी’ची एन्ट्री झालीय. होय, श्रद्धाशी बे्रकअप झाल्यानंतर फरहान ३७ वर्षांची अभिनेत्री व गायिका शिबानी दांडेकर हिला डेट करतोय. अर्थात दोघांनीही हे नाते अद्याप मान्य केलेले नाही. शिबानी व फरहान या दोघांशीही याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. पण गेल्या काही महिन्यात दोघांचेही नाते बरेच बहरल्याचे कळतेय.
२०१५ पासून फरहान व शिबानी एकमेकांना ओळखतात. फरहान जो शो होस्ट करत होता. शिबानीही त्या शोचा भाग होती़ पुढे त्यांची मैत्री झाली आणि आताश: हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय. आता दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही.फरहान हा घटस्फोटित आहे. दोन मुलांचा बाप आहे. तूर्तास ‘द स्काज इज पिंक’च्या शूटींगमध्ये तो बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरूवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.