अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि पत्नी शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार अशी चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या शिबानी दांडेकर वयाच्या ४४ व्या वर्षी गरोदर असल्याची बातमी पसरली आहे. २०२२ मध्ये फरहान आणि शिबानी लग्नबंधनात अडकले. फरहानचं हे दुसरं लग्न असून पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत. दरम्यान आता तो पुन्हा बाबा होणार असल्याची माहिती काही मिडिया रिपोर्ट्सने दिली आहे.
पिंकव्हिला रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी यावर्षाच्या शेवटी आईबाबा होणार आहेत. शिबानीचं वय ४४ आहे त्यामुळे त्यांनी सरोगसी किंवा IVF चा पर्याय स्वीकारला असल्याची शक्यता आहे. अद्याप दोघांनीही बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये किती तथ्य आहे हे सांगता येत नाही. तरी सोशल मीडियावर शिबानीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या आठवड्यात शिबानी आणि फरहान हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेले होते. यानंतर पापाराझींनी कन्फर्म केलं की कपल लवकरच गुडन्यूज देणार आहे.
दरम्यान आज फहान अख्तर ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्रीच दोघांनी मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केला. तर आज त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या बातमीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेता, गायक, निर्माता, लेखक, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अशी बहुगुणी ओळख असलेला हा अभिनेता आहे फरहान अख्तर (Farhan Akhtar). फरहान अख्तरने २००० साली हेअरस्टायलिस्ट अधुना भबानीसोबत लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलीही झाल्या. मात्र दोघांनी २०१७ साली म्हणजेच तब्बल १७ वर्षांनी घटस्फोट घेतला. यानंतर काही वर्षांनी फरहान शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आला. २०२२ मध्ये त्यांनी लग्नही केलं.