Join us

फरहान अख्तरने कंगना राणौत आणि हृतिक रोशनच्या वादात घेतली हृतिकची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 11:42 AM

कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद मीडियात सध्या चांगलाच रंगला आहे. या वादाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. आता ...

कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद मीडियात सध्या चांगलाच रंगला आहे. या वादाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. आता इंडस्ट्रीतील अनेकजण देखील या वादावर आपले मत व्यक्त करू लागले आहेत. काही जण यात कंगनाची बाजू घेत आहेत तर काही जणांनी या सगळ्यात हृतिकची बाजू बरोबर असल्याचे म्हटले आहे. आता या वादात अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तरने उडी घेतली आहे. या सगळ्यात हृतिकच बरोबर असल्याचे त्याचे म्हणणे असून त्याने याबाबत एक भले मोठे पत्र देखील लिहिले आहे. फेसबुकवर त्याने लिहिलेल्या पत्राची सध्या चांगलीच चर्चा आहे.त्याने पत्रात म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून हा वाद सुरू असून पहिल्यांदाच त्या पुरुषाने आपले वक्तव्य मांडले आहे. कोण बरोबर आणि कोण चुकीचे हे मी ठरवणारा कोणीही नाही. हे सायबर क्राइमचे ऑफिसर ठरवतील. पण यावर भाष्य करावे असे मला वाटत असल्याने मी लिहित आहे. चार वर्षांपूर्वी मी मर्द (मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन) ची स्थापना केली. लिंगभेदाबाबत होत असलेल्या वादात मी नेहमीच माझी बाजू मांडली आहे. काही वेळा स्त्रिया देखील चुकीच्या असतात. काही वेळा पुरुषांना देखील मानसिक छळ सहन करावा लागतो. मीडियात सध्या जे काही सुरू आहे ते अतिशय चुकीचे असल्याचे मला वाटते. काही पत्रकार हे एकाच व्यक्तीची बाजू घेत असल्याचे दिसत आहे. हे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?Also Read : हृतिक रोशनचा दावा; अर्ध्या रात्री रूममध्ये आली होती कंगना राणौत, पाठोपाठ रंगोलीही आली!भावना, न्याय सगळे काही बाजूला ठेवून आपण काही गोष्टींचा विचार करूया... त्या दोघांमध्ये सात वर्षांचे नाते आहे असे ती म्हणत आहे. तसेच त्यांनी इमेलद्वारे अनेकवेळा संभाषण केल्याचा तिचा दावा आहे. पण त्याने तिला कधीही मेल केलेला नसल्याचे त्याने म्हटले आहे आणि त्याविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. चौकशीसाठी त्याने त्याचे फोन, लॅपटॉप पोलिसांकडे सुर्पूद केले आहेत. पण तिने आतापर्यंत असे काहीही केलेले नाही. ते दोघे सात वर्षं नात्यात होते तर तिच्याकडे कोणताही पुरावा का नाहीये. तिने जो फोटो सगळ्यांच्या समोर आणला आहे. तो फोटो खोटा असल्याचे पाहताच क्षणी दिसत आहे. हा फोटो एका ग्रुपसोबत घेण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्या व्यक्तीच्या पूर्वपत्नीचा देखील समावेश होता. हा फोटो क्रॉप करून का समोर आणण्यात आला आहे? तसेच या इमेल्समुळे तिचा मानसिक छळ झाला असे तिचे म्हणणे होते तर ती एवढ्या दिवस गप्प का होती?त्या दोघांनी बाहेरदेशात साखरपुडा केला असल्याचे तिचे म्हणणे आहे. पण त्याच्या पासपोर्टवर ती ज्या शहराचा उल्लेख करत आहे, त्याचा स्टॅम्पच नाहीये. या सगळ्यामुळे आपल्या डोक्यात काही प्रश्न निर्माण होत नाहीत का?काही लोक निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत, तर काहींना त्या स्त्रीला बोलते करून आपला फायदा मिळवायचा आहे. हे सगळे केवळ टिआरपीसाठी केले जात आहे. त्यामुळे या सगळ्यात मी माझे मत मांडावे असे मला वाटते. Also Read : रणबीर कपूर आणि कंगना राणौतमध्ये होते शारीरिक संबंध?