Join us

फरहान अख्तरचे मॉडलिंगच्या दिवसात या अभिनेत्रीसोबत होते अफेअर... पण या कारणामुळे होऊ शकले नाही लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:48 AM

फरहानने अनेक वर्षं मॉडलिंगच्या क्षेत्रात काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अधुना फरहानच्या आयुष्यात येण्याआधी तो एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता आणि या अभिनेत्रीसोबत त्याला लग्न देखील करायचे होते.

फरहान अख्तरची सुरुवातीची ओळख ही केवळ एक दिग्दर्शक म्हणून होती. पण आता त्याने एक अभिनेता म्हणून देखील त्याची एक जागा चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांचा फरहान मुलगा असल्याने चित्रपटसृष्टीत एंट्री करणे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. त्याने दिल चाहता है या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्याने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर त्याने रॉक ऑन या चित्रपटापासून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला त्याच्या अभिनयासाठी आणि दिग्दर्शनासाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो एक चांगला गायक देखील आहे. फरहान नेहमीच त्याच्या व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण त्याचसोबत तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील  तितकाच चर्चेत असतो. फरहानचे लग्न २००० मध्ये अधुनासोबत झाले. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. त्यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण त्यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अधुना आणि फरहानची ओळख मॉडलिंगच्या दिवसांत झाली होती. फरहानने अनेक वर्षं मॉडलिंगच्या क्षेत्रात काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अधुना फरहानच्या आयुष्यात येण्याआधी तो एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता आणि या अभिनेत्रीसोबत त्याला लग्न देखील करायचे होते. अभिनेत्री सुमन रंगनाथनने फरेब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली, त्यानंतर ती अक्षय खन्नासोबत आ अब लौट चले या चित्रपटातही झळकली होती. फरहानच्या मॉडलिंग करियरच्या सुरुवातीच्या काळात तो सुमन सोबत नात्यात होता. सुमन त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. पण तरीही तो तिच्यासोबत लग्न करायला तयार होता. पण सुमनला कोणत्याच नात्यात अडकण्याची इच्छा नव्हती. तिला तिचे स्वतंत्र आयुष्य जगायचे होते आणि त्याचमुळे ते दोघे वेगळे झाले आणि काही काळानंतर अधुना फरहानच्या आयुष्यात आली.सुमनचे फरहान प्रमाणेच अभिनेता राहुल रॉय सोबत असलेले प्रेमप्रकरण देखील चांगलेच गाजले होते. ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील त्या काळात मीडियात गाजल्या होत्या. 

 

टॅग्स :फरहान अख्तर