फरहान अख्तर व शिबानी दांडेकर या ‘लव्ह बर्ड’चा रोमान्स जोरात सुरु आहे. हे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही. २०१८ मध्येच या कपलने आपले जगजाहिर केले आणि यानंतर फरहान-शिबानी अगदी ‘खुल्लम खुल्ला’ गळ्यात गळा घालून हिंडू फिरू लागलेत. पण त्यांचे हे ‘खुल्लम खुल्ला’ प्रेम कुटुंबाला मात्र पचवता आलेले नाही. होय, ताजी चर्चा खरी मानाल तर फरहान-शिबानीच्या रोज व्हायरल होत असलेल्या बोल्ड फोटोंवर फरहानचे कुटुंबीय नाराज आहे.काही दिवसांपूर्वी फरहान व शिबानी विदेशात हॉली डेवर गेलेत. याठिकाणी दोघांनीही बीचवर धम्माल मस्ती केली. त्यादरम्यानचे त्यांचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हे फोटो फरहान व शिबानीच्या चाहत्यांना भलेही आवडतो पण कुटुंबाला मात्र जराही आवडले नाहीत.
डेक्कन क्रोनिकलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, फरहानचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झालाय. तो दोन मुलींचा बाप आहे. त्याला आयुष्यात आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण गर्लफे्रन्डसोबतचे त्याचे ताजे फोटो मात्र समजण्यापलीकडे आहे. फरहान पहिल्या पत्नीसोबत इतका बिनधास्त नव्हता. मग गर्लफ्रेन्डसोबत इतके बिनधास्त वागून फरहान काय सिद्ध करू इच्छितो, असा प्रश्न त्याच्या कुटुंबाला पडलाआहे. कदाचित शिबानी या रिलेशनशिपमध्ये स्वत:ला असुरक्षित समजते. त्याचमुळे आम्ही कपल आहोत, हे फरहानने जगाला ओरडून सांगावे, अशी तिची इच्छा असावी.आता या बातमीत किती तथ्य आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण फरहान व शिबानी सध्या काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत, इतके मात्र खरे.