Join us

Sunny Deol Video: 'आप सनी देओल जैसे लगते हैं', शेतकऱ्याचं वाक्य ऐकून सनी देओलही शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 6:01 PM

Sunny Deol Video: सनी देओल सध्या गदर २ (Gadar 2 ) च्या शूटींगमध्ये बिझी आहे. अहमदनगरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सनीने शेअर केला आहे.

 Sunny Deol Video: सनी देओल सध्या गदर २ (Gadar 2 ) च्या शूटींगमध्ये बिझी आहे. अहमदनगरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सनी देओलने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत सनी देओल भररस्त्यात एका शेतकऱ्याशी गप्पा करताना दिसतोय.

एक शेतकरी बैलगाडी घेऊन रस्त्याने जात असताना अचानक त्याच्यासमोर सनी देओल येतो. बैलगाडीतून काय नेतोय, असं सनी त्या शेतकऱ्याला विचारतो. यावर जनावरांसाठी खायला नेतोय, असं शेतकरी म्हणतो. यानंतर सनी देओल दुसऱ्या फ्रेममधून एन्ट्री करतो. तो शेतकऱ्याशी हात मिळवतो. बिचारा शेतकरी, तो सनी देओलला ओळखूच शकत नाही. तुम्ही तर बिल्कुल सनी देओलसारखे दिसता, असं तो म्हणतो. शेतकऱ्याचं ते वाक्य ऐकून सनी हसायला लागतो. हो, तो मीच आहे, असं सनी सांगतो तेव्हा शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्का बसतो. अरे बापरे म्हणत तो पुन्हा सनीशी हात मिळवतो. आम्ही तुमचे सिनेमे बघतो. तुमचे व तुमच्या वडिलांचे चित्रपट व व्हिडीओही पाहतो, असं शेतकरी म्हणतो.

सनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे. अनेकजण सनीचं कौतुक करत आहेत. शेतकऱ्याशी बोलणारा पहिला अभिनेता पाहिला, असं एक चाहता म्हणाला. या अभिनेत्यात अजिबात ॲटीट्यूड नाही, अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे.

सनीच्या गदर २ या सिनेमाबद्दल सांगायचं तर, अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत. ‘गदर 2’मध्ये (Gadar 2) सनी देओल (SunnyDeol) पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत आहे. तर अमिषा सकिनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट, 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलबॉलिवूड