प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि मॉडेल मुस्कान नारंगने आत्महत्या केली आहे. २५ वर्षीय मुस्कानेन बेडरुमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
मुस्कानंच कुटुंब उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील राम गंगा विहार कॉलनीत राहत. मार्च महिन्यात होळीसाठी ती मुंबईहून घरी आली होती, त्यानंतर परत गेलीच नाही, ती कुटुंबीयांसोबतच राहत होती. मुस्कानने देहरादून येथे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. त्यानंतर मुंबईत येऊन ती फॅशन डिझायनिंगमध्ये जॉब करत होती.
माझे आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण सगळे मलाच समजवायला लागले. आज मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. यासाठी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ नये,” असं तिने व्हिडीओत म्हटलं होतं.
गळफास घेण्यापूर्वी मुस्कानेन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. ''हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. यानंतर मी तुम्हाला कदाचित दिसणार नाही. लोक म्हणतात, प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर सगळं व्यवस्थित होते, पण तसं झालं नाही. मी खूप प्रयत्न केला माझे आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण सगळे मलाच समजवायला लागले. मी जे काही आज करणार आहे ते माझ्या इच्छेने. यासाठी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ नये,” असं तिने व्हिडीओत म्हटलं होतं.
गुरुवारी मुस्कानने(२७ एप्रिल) कुटुंबासोबत बसून जेवण केलं, त्यानंतर ती तिच्या बेडरुमध्ये गेली. जेव्हा शुक्रवारी सकाळी मुस्कानने दार उघडला नाही तेव्हा कुटुंबीयांनी आता पहिल्यानंतर त्यांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुस्कानच्या कुटुंबात आईबाबा, तीन बहिणी व एक भाई आहे. मुस्कान सगळ्यात मोठी होती. मुस्कानचे वडील डिस्पोजेबल क्रॉकरीचा व्यवसाय करतात. मुस्कानच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुणी काही बोलण्याच्या मनस्थिती नाही.