Join us

सोनू सूदचं कमाल दिग्दर्शन अन् तगडी अ‍ॅक्शन! 'फतेह' सिनेमाचा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:08 IST

सोनू सूदच्या आगामी 'फतेह' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (fateh)

सोनू सूद हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सोनू सूदला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सोनू सूदचा आगामी सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा म्हणजे 'फतेह'. या सिनेमाच्या माध्यमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करतोय. सोनू सूदच्या आगामी 'फतेह'चा टीझर रिलीज झालाय. आजवर बॉलिवूडमध्ये कधीही न पाहिलेली अ‍ॅक्शन या सिनेमातून बघायला मिळणार आहे. पाहा सिनेमाच्या टीझरमध्ये काय.

सोनू सूदच्या 'फतेह'चा टीझर

सोनू सूदचं दिग्दर्शन पदार्पण करणाऱ्या 'फतेह'मध्ये त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत दाखवले आहेत. सिनेमातील प्रमुख कलाकार हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात दमदार ॲक्शन सीक्वेन्स आणि सायबर क्राईमभोवती फिरणारी आकर्षक कथा दिसणार आहे. आजवर बॉलिवूडमध्ये कधीही न दिसलेली दमदार ॲक्शन आणि थ्रिलिंग अनुभव या सिनेमातून पाहायला मिळणार यात शंका नाही.

कधी रिलीज होणार फतेह?

झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन निर्मित 'फतेह' सिनेमात भारतीय सायबर गुन्ह्यांबद्दल एक नवीन दृष्टीकोन लोकांना दिसेल अशी अपेक्षा आहे. हा सिनेमा १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन सोनू सूदने केलं असून त्याच्यासोबत विजय राज, नसीरुद्दीन शाह, जॅकलीन फर्नांडीसही प्रमुख भूमिकेत आहे. ॲक्शन थ्रिलर पाहण्याची आवड असणाऱ्या सिनेमांना 'फतेह' नक्की आवडेल, यात शंका नाही.

टॅग्स :सोनू सूदजॅकलिन फर्नांडिसनसिरुद्दीन शाह